Millet Year : आहारात तृणधान्यांचा समावेश करा ः चलवदे

‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३’ चे औचित्य साधून मकर संक्रांती भोगी या सणाचा दिवस जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.
Millet Year
Millet YearAgrowon

नांदेड : ‘‘नागरिकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य (Millets In Diet) असलेल्या ज्वारी, बाजरी (Pearl Millet), नाचणी (Ragi), वरई, राळा व राजगिरा या धान्यांचा समावेश करावा,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी रविशंकर चलवदे (Ravishankar Chalvade) यांनी केले.

Millet Year
Millets : भरडधान्यावर प्रक्रिया करण्याची गरज का आहे?

‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३’ चे औचित्य साधून मकर संक्रांती भोगी या सणाचा दिवस जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्त ‘आत्मा’च्या कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Millet Year
Millet Year : पौष्टिक तृणधान्याची आहारातील व्याप्ती वाढवावी

यात ‘तृणधान्यांचे आरोग्यातील महत्त्व यावर चर्चासत्र घेण्यात आले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे, ‘आत्मा’च्या प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, नांदेड तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्‍वर मोकळे उपस्थित होते.

या वेळी सायाळ येथील शेतकरी रत्नाकर ढगे यांनी मनोगत व्यक्त केले. माधुरी सोनवणे यांनी प्रस्ताविक केले. सिद्धेश्‍वर मोकळे यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com