Artificial Flower
Artificial FlowerAgrowon

Plastic Flower : एकवेळ वापर उत्पादनात प्लॅस्टिक फुले समाविष्ट करा

प्लॅस्टिकची फुले बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने एकीकडे पर्यावरणाचा दुसरीकडे शेतकऱ्यांचे अर्थकारण अडचणीत आहे.

नाशिक : प्लॅस्टिकची फुले (Plastic Flower) बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने एकीकडे पर्यावरणाचा दुसरीकडे शेतकऱ्यांचे अर्थकारण (Farmer Economy) अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक फुलांवर बंदी (Ban Plastic Flower) घालण्यासाठी फूल उत्पादक शेतकरी राहुल पवार यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवाद यांच्या न्यायालयासमोर याचिका दाखल केली आहे.

Artificial Flower
Nishigandha Flower : शेतकरी का देत आहेत निशिगंधाला पसंती ?

यासंबंधी याचिकेवर तिसरी सुनावणी झाली. प्लॅस्टिक फुलांच्या उत्पादनाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीपुढे विषय मांडावा, एकवेळ वापर होणाऱ्या प्लॅस्टिक उत्पादनात प्लॅस्टिक फुले समाविष्ट करावीत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाकडे दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Artificial Flower
Rose Flower Exhibition : अकोल्यात दोन दिवस गुलाब फुलांचे प्रदर्शन

राष्ट्रीय हरित लवादाने मागील सुनावणीत वन आणि पर्यावरण मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे महानगरपालिका व पुणे जिल्हाधिकारी यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास व संबंधित कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार संबंधितांनी त्यांचे म्हणणे मांडले.

Artificial Flower
Artificial Flower : प्लॅस्टिक फुले विक्रीचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादासमोर

‘प्लॅस्टिक बंदी कायदा २०१६’ अन्वये महाराष्ट्र राज्य शासनाने २०१८ साली एकल (सिंगल) वापर प्लॅस्टिक बंदी केली होती. परंतु त्यात कृत्रिम प्लॅस्टिक फुलांचा समावेश नव्हता. त्यामुळे प्लॅस्टिक फुलांचा वापर वाढून प्रदूषण होऊन पर्यावरणाचे नुकसान होत होते. त्याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली.

त्यानुसार न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नेमलेल्या समितीला प्लॅस्टिक फुले ही संपूर्ण देशात बंदीच्या कक्षेमध्ये येण्यासाठी एकल वापर प्लॅस्टिक यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या.

दोन महिन्यांत त्यावर कार्यवाही करून अंतिम अहवाल दोन महिन्यांच्या आत सादर करण्यास सांगितले आहे.राष्ट्रीय हरित लवादासमोर याचिकाकर्ते पवार यांच्या वतीने बाजू डॉ. ॲड. सुधाकर आव्हाड, ॲड. चेतन नागरे व ॲड. सिद्धी मिरघे यांनी मांडली.

‘प्लॅस्टिक फुले ही २९ मायक्रोनची’

‘एकवेळ प्लॅस्टिक वस्तू वापर’ या अधिसूचनेत १०० मायक्रोनपेक्षा कमी वापरास प्रतिबंध आहे. मात्र प्लॅस्टिक फुले ही २९ मायक्रोनची असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत यापूर्वी समोर आले आहे. पवार यांनी त्याचे अहवाल न्यायालयाकडे सादर केल्याने यापूर्वी पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाला नोटीस काढली होती.

बाजारात कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. परिणामी कचरा म्हणून फेकून दिल्यानंतर प्रदूषण वाढते. ही फुले पॉलिथिन आणि घातक सिंथेटिक रंगांनी बनविली आहेत. त्यांचे विघटन होण्यासाठी कोणत्याही प्लॅस्टिक इतकाच वेळ लागतो. त्यांची टिकवण क्षमता कमी व वातावरणीय परिस्थितीमुळे रंग उडत असल्याने पुनर्वापर होत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com