
परभणी ः केंद्रीय बियाणे समितीच्या (Seed Committee) शिफारशीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा (Tur Verity) बीडीएन २०१३-२ (रेणुका), सोयाबीनचा एमएयूएस -७२५ (Soybean MAUS -725) , करडईचा (Safflower) पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या तीन वाणांचा (Crop Verities) समावेश भारताचे राजपत्रामध्ये (द गॅझेट ऑफ इंडिया) करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने त्याबाबतची अधिसूचना सोमवारी (ता. ६) प्रसिद्ध केली आहे. देशाच्या राजपत्रामधील समावेशामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल, असे कुलगुरूच डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी सांगितले.
याबद्दल करडई पैदासकार डॉ. श्यामराव घुगे, तूर पैदासकार डॉ. डी. के. पाटील, सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहत्रे आदींसह सर्व संबंधित शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तुरीच्या रेणुका वाणास महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली आहे.
सोयाबीनच्या एमएयुएस-७२५ आणि करडईच्या पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणांना राज्यात लागवडीस मान्यता प्राप्त झाली आहे.
देशाच्या राजपत्रातील समावेशामुळे या तीन वाणांचे बीजोत्पादन हे मुख्य बियाणे साखळीमध्ये घेता येईल, असे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.