पंढरपुरात अभिजित पाटलांच्या कारखाना, कार्यालयावर प्राप्तिकरचे छापे

अवघ्या वीस दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकणारे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर, पंढरपूरमधील घरावर आणि पतसंस्थेच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून (इनकम टॅक्स) गुरुवारी (ता. २५) छापे टाकण्यात आले.
IT Raid
IT RaidAgrowon

सोलापूर : अवघ्या वीस दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Vithhal Cooperative Sugar Factory) निवडणूक जिंकणारे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांच्या कारखान्यावर, पंढरपूरमधील घरावर आणि पतसंस्थेच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून (इनकम टॅक्स) (Income Tax Raid) गुरुवारी (ता. २५) छापे टाकण्यात आले.

IT Raid
Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

गुरूवारी पहाटे ही छापेमारी करण्यात आली असून, पाटील यांचे पंढरपूरमधील कार्यालय, घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयात मुख्यतः ही तपासणी सुरू आहे. दिवसभर कारवाई सुरूच असल्याची माहिती आहे.

IT Raid
Cotton : कपाशीवर घोंगावतेय गुलाबी बोंड अळीचे संकट

अभिजित पाटील हे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय चोराखळी (उस्मानाबाद), नांदेड, नाशिक आणि सांगोला साखर कारखाना असे चार कारखाने श्री. पाटील चालवतात. या चार कारखान्यांच्या यशस्वी कारभारानंतर आता अलीकडेच पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याची निवडणूक झाली. त्यात २१ पैकी सर्वाधिक २० जागा मिळवत एकहाती सत्ता त्यांनी मिळवली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या पॕनेलचा त्यांनी पराभव केला. कारखान्याची निवडणूक आणि या घटनेचा काही संबंध आहे का, याबाबत आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com