Water Resource : गुंजवणीच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाचे चुकीच्या पद्धतीने काम

गुंजवणी धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन बाकी आहे. काही ठिकाणी नियमबाह्य वसाहतीसाठी जागा दिल्याने त्या ठिकाणी नागरी सुविधा नाहीत.
Gunjawani Water
Gunjawani WaterAgrowon

वेल्हे, ता. भोर ः ‘‘गुंजवणी धरणग्रस्तांचे (Gunjawani Dam Affected) अद्यापही पुनर्वसन बाकी आहे. काही ठिकाणी नियमबाह्य वसाहतीसाठी जागा दिल्याने त्या ठिकाणी नागरी सुविधा नाहीत. वांगणी उपसा सिंचन प्रकल्पामध्ये (Irrigation Project) वांगणीवाडी, कोळवडी गावांचा समावेश नाही.

Gunjawani Water
Micro Irrigation : सूक्ष्म सिंचनासाठी १३० कोटी उपलब्ध

बंद पाइपलाइनबाबत शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतले जात नाही,’’ अशा अनेक तक्रारी गुंजवणी धरण प्रकल्प जलसंपदा विभागाच्या (Water Resource Department) बाबतीत येत असून, सासवडच्या माजी मंत्र्यांच्या अट्टहासापायी गुंजवणी धरणाचे पाणी अडवण्यासाठी अनेक चुकीच्या पद्धतीची कामे जलसंपदा विभागाकडून केली जात आहेत याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली.

वेल्हे पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधील सभागृहामध्ये मंगळवारी (ता.४) आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे, नीरा देवधर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, गटविकास अधिकारी पंकज शेळके, वेल्ह्याचे माजी सभापती दिनकर सरपाले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, गुंजवणी धरणग्रस्त संघटक गणपत देवगिरीकर, राजगडचे संचालक संदीप नगिने, शोभा जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना राऊत, युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर उपस्थित होते.

Gunjawani Water
Irrigation : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार कोटी

गुंजवणी धरणग्रस्तांचे पुनर्वसन अद्यापही बाकी असून जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये गेले. अनेक वर्षे खेटे मारून कामे होत नसल्याचा आरोप या वेळी गुंजवणी धरणग्रस्त समितीचे संघटक गणपत देवगिरीकर यांनी केला.

गुंजवणी बंद पाइपलाइनचे सर्वेक्षण यापूर्वी वेल्हे चेलाडी रस्त्याच्या वरील बाजूस डोंगराच्या बाजूने केले होते. त्यामध्ये बदल करून गुंजवणी नदीच्या बाजूने नवीन सर्वेक्षण आले असून जुन्या भूसंपदान केलेल्या जमिनीवरील शेरे काढण्यात यावे, अशी मागणी मार्गासनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे यांनी केली.

वेल्हे तालुक्यातील अनेक गावे पीएमआरडीच्या हद्दीत गेली असल्याने येथील सुविधांबाबत समस्या निराकरण करण्यासाठी नसरापूर येथील क्षेत्रीय कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याची तक्रार शिवाजी चोरगे यांनी केली.

दापोडे येथील विविध विकास सोसायटीमध्ये बोगस सभासदांची संख्या मोठी असून, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. बँकेच्या संचालकांचा मनमानी कारभार चालला असल्याची तक्रार युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर यांनी केली. तर वेल्हे चेलाडी रस्त्याची दुरवस्था, रेंगाळलेल्या प्रशासकीय इमारत, बहुचर्चित ग्राम न्यायालय, करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत वाढत चाललेल्या तक्रारी, पंचायत समिती विभाग, एसटीची समस्या, महावितरण, पोलिस स्टेशन आदी विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com