Jasmine Farming : मोगरा लागवडीमुळे आर्थिक मिळकतीत वाढ

डहाणू तालुक्यातील शेनसरी, पावन, सायवण आदी गावांतील आदिवासी कुटुंबांना मोगरा लागवडीतून रोख पैसा मिळत असून, स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे.
Arabian Jasmine
Arabian JasmineAgrowon

Flower Farming कासा : डहाणू तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी रोजगारासाठी मोगरा लागवड (Jasmine Cultivation) केली आहे. यासाठी पाण्याचे व्यवस्थापन (Water Management) आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेत मोगरा फुलशेतीवर (Floriculture) भर दिला आहे.

मोगरा, कागडा या फुलांच्या लागवडीतून त्यांना वर्षभर टप्प्याटप्प्याने उत्पन्नाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक मिळकत वाढविली आहे.

डहाणू तालुक्यातील शेनसरी, पावन, सायवण आदी गावांतील आदिवासी कुटुंबांना मोगरा लागवडीतून रोख पैसा मिळत असून, स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे. पावन चरी गावात तब्बल ३० कुटुंबे मोगरा उत्पादनातून रोजगार मिळवत आहेत.

Arabian Jasmine
Floriculture : शेवंतीच्या शेतात 'एलईडी'चा प्रकाश

डहाणू तालुक्यात धामणी धरणामुळे सिंचनाचे प्रमाण अधिक असल्याने मिळणाऱ्या पाण्याने अनेक शेतकरी सध्या विविध फुलांचे उत्पन्न घेत आहेत. या भागांतील शेतकरी दादर येथील फूल बाजार फूल व्यापाऱ्यांना मागणीनुसार मोगरा पुरवितात.

पहिल्या दर्जाच्या मालाला प्रतिकिलो दोन हजार रुपये किलो भाव मिळत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

Arabian Jasmine
मोगरा लागवड

अनेक ओसाड माळरानावर शेतकरी मोगऱ्याच्या कांड्या आणून लावतात. यासाठी धरणाचे पाणी, कूपनलिका किंवा विहीर या पाण्याच्या स्रोतांचा वापर करून आधुनिक पद्धतीच्या ठिबक सिंचनने पाणी पुरविले जाते.

या मोगरा पिकामुळे दर दोन दिवसाआड फुले तोडण्यासाठी ३० ते ४० जणांना काम मिळते. या कळ्या तोडल्या जाऊन त्या रात्री मुंबई बाजारपेठेत पाठवल्या जातात. यामुळे येथील नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी आम्ही तीन एकरांवर मोगऱ्याची लावगड केली. यातून सध्या एक दिवस आड २० ते २५ किलोपर्यंत मोगऱ्याची फुले मिळत आहे. यातून ४० ते ४५ हजारांचे उत्पन्न मिळत आहे.
कल्पेश पाटील, मोगरा उत्पादक
मोगरा वाडी सांभाळण्यासाठी आम्ही नवरा-बायको दोघे कामाला आहोत. यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे.
विजय कोरडा, कामगार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com