Weather Update : उन्हासह उकाड्यातही वाढ

रत्नागिरीत दहा वर्षांतील उच्चांकी ३९.३ अंश तापमान
Weather Update
Weather UpdateAgrowon

Weather Update News : राज्याच्या काही भागात पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका अशी परस्पर विरोधी स्थिती अद्यापही टिकून आहे. राज्याच्या किमान तापमानात (Temperature) हळूहळू वाढ होत असून, कमाल तापमानाचा पाराही चढता आहे.

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३६ अंशापार गेला आहे. रत्नागिरी येथे फेब्रुवारी महिन्यातील गेल्या दहा वर्षांच्या उच्चांकी ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

कमाल तापमानात वाढ झाल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. दुपारच्या वेळी घामाच्या धारा वाहत आहेत. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश तापमान नोंदले गेले.

हे रत्नागिरी येथील फेब्रुवारी महिन्यातील गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी तापमान आहे. यापूर्वी २०१७ मध्ये २५ तारखेला ३९.३ अंश, तर २०१२ मध्ये २२ तारखेला ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अकोला येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Weather Update
Hawaman Update : राज्यात उन्हाळ्याची चाहूल; अकोल्यात उच्चांकी तापमान | ॲग्रोवन

किमान तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली असली तरी, उत्तर महाराष्ट्रात गारठा टिकून आहे. निफाड येथील गहु संशोधन केंद्रात नीचांकी ६.६ अंश तापमानाची नोंद झाली. पुणे, जळगाव, धुळे येथे तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे.

राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.७ (९.९), जळगाव ३६.३ (१०.०), धुळे ३५.०(९.७), कोल्हापूर ३४.६ (१८.७), महाबळेश्वर २९.८ (१५.४), नाशिक ३४.५ (११.८), निफाड ३३.१(६.६), सांगली ३५.८ (१६.८), सातारा ३४.४ (१६.०), सोलापूर ३६.८ (१७.६), सांताक्रूझ ३५.८ (१९.४), डहाणू ३१.२ (१९.१), रत्नागिरी ३९.४ (२२.३), औरंगाबाद ३५.७ (१२.७), नांदेड ३५.६ (१७.२), परभणी ३५.८(१३.९), अकोला ३७.५ (१४.४), अमरावती ३६.४(१६.१), बुलडाणा ३२.४(१७.५), ब्रह्मपुरी ३५.२ (१६.५), चंद्रपूर ३४.२(१६.४), गडचिरोली ३३.०(१२.८), गोंदिया ३१.० (१४.२), नागपूर ३४.० (१५.६), वर्धा ३५.९(१७.६), वाशीम ३६.४ (१४.६), यवतमाळ ३४.० (१७.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com