Crop Loan Latest News : ‘पीडीसीसी’ बँकेकडून ४२ पिकांच्या कर्ज रकमेत वाढ

Kharif Crop Loan : गेल्या काही वर्षापासून पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कर्जाच्या रकमेत वाढ केली आहे.
PDCC Bank
PDCC BankAgrowon

PDCC Bank Crop Loan : गेल्या काही वर्षापासून पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कर्जाच्या रकमेत वाढ केली आहे.

यंदा तब्बल ४२ पिकांसाठी कर्ज रकमेत वाढ केली गेली आहे. यामध्ये आडसाली ऊस, फळबागा, खरीप, रब्बी, चारा पिके, फुले आदी पिकांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा ही सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ८३ हजार रुपयांपर्यंतची वाढ आहे.

दरवर्षी पिकांच्या वार्षिक उत्पादनाच्या खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेल्या दरावर प्रगतिशील शेतकरी, तसेच जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली, त्यामध्ये ४२ पिकांच्या कर्ज रकमेत वाढ करण्याचे निश्चित करण्यात आले. चालू २०२३-२४ च्या आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.

PDCC Bank
Crop Loan : अकोला जिल्ह्यात ४९ टक्के कर्ज वाटप

गेल्या वर्षी तब्बल २६ पिकांच्या कर्ज रकमेत वाढ केली होती. यंदा ४२ पिकांसाठी ही वाढ केली आहे. पुणे जिल्ह्यातील बँकेकडून शेती कर्जामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला आदी पिकांसाठी कर्ज दिले जाते.

चालू वर्षी फळपिकांमध्ये अंजीर पिकासाठी तब्बल ८३ हजार रुपयांची, तर पपईसाठी ५० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतीपिकांमध्ये खोडवा उसासाठी सर्वाधिक ४० हजार रुपयांची वाढ केली आहे, तर आडसाली उसामध्ये २८ हजार रुपयांची वाढ केली गेली आहे.

संकरीत जिरायती ज्वारी, जिरायत बाजरी, भात, उडीद, भुईमूग पिकांच्या कर्जाच्या रकमेतही एक ते दहा हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तसेच मधमाशीपालन करण्यासाठी नव्याने कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध केली असून, दहा पेट्यांसाठी ८० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

या पिकांच्या कर्जदार वाढ झालेली नाही :

कोरफड, पानमळा, शुगर बीट, तुती लागवड, खरीप सुधारीत ज्वारी, तीळ, सूर्यफूल, जवस, एरंडी, मूग, नागली, वाल, मिरची, लसूण, हळद, आले, रब्बी ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा, करडई, हुलगा, लसूणघास, मका, लिंबू, ड्रॅगन फ्रूट, बोर, चिकू, नारळ, हापूस आंबा, आवळा, कलिंगड, टरबूज, ढोबळी मिरची, कारली, दोडका, घेवडा, जाई, मोगरा, कंदवर्गीय पिके, शेडनेटमधील पिके

PDCC Bank
Crop Loan : यवतमाळला ७५ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

पिकांचे पीक कर्जाचे दर व कंसात झालेली वाढ

आडसाली ऊस १,६०,००० (२८,०००), पूर्व हंगामी १,५०,००० (२४,०००) सुरू १,५०,००० (२४,०००), खोडवा १,४०,००० (४०,०००), द्राक्षे १,३५,००० (३०,०००), केळी १,३५००० (३५,०००), टिश्युकल्चर केळी १,६५,००० (२५,०००), केळी खोडवा १,००,००० (४०,०००), टिश्युकल्चर केळी खोडवा १,००,००० (२५,०००), मका ३६,००० (४०००), बटाटा १,००,००० (२५,०००),

बटाटे (वेफर्ससाठी) १,००,००० (२०,०००), टोमॅटो १,००,००० (२०,०००), संकरीत ज्वारी खरीप ३०,०००(१०००), संकरित ज्वारी जिरायत ३०,००० (३०००), बाजरी ३०,००० (३०००), जिरायत बाजरी २५,००० (१०००), भात ६५,००० (७०००), मका ३६,००० (६०००), सोयाबीन ५५,००० (६०००), बागायती भूईमूग ५०,००० (१०,०००),

रब्बी उडीद २६००० (६०००), तूर ४०,००० (५०००), खरीप कांदा १,००,००० (२०,०००), संकरित बागायत ज्वारी ३५,००० (२०००), संकरित उन्हाळी भात ६५,००० (७०००), उन्हाळी भूईमूग ४५,००० (५,०००), सूर्यफूल ३०,००० (३०००), गजरात ३४, ००० (२०००),

रब्बी कांदा १,००,००० (२०,०००), रब्बी बटाटा १,००,००० (२५,०००), कागदी लिंबू ८८,००० (८०००), पेरू १,००,००० (४०,०००), मोसंबी ८८,००० (८०००), पपई ७७,००० (५०,०००),डळिंब १,७५,००० (३५,०००), सीताफळ ६०,००० (५०००), अंजीर १,२५,००० (८३,०००)

मागील सहा वर्षांत झालेली वाढ

वर्ष --- पिकांची संख्या -- वाढ झालेली रक्कम

२०१८ -- १४ -- २१,०००

२०१९ -- ८ -- १०,०००

२०२० --- ३५ -- ५५,०००

२०२१-- २ -- ६०००

२०२२ -- २६ -- २१०००

२०२३ -- ४२ -- ८३,०००

गेल्या काही वर्षापासून पिकांच्या खर्चात वाढ होत आहे. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेताना अनेकदा अडचणी येतात. त्यासाठी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पिकांच्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे.
- प्रा. डॉ दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com