Weather Update : राज्याच्या किमान तापमानात वाढ

राज्यात झालेल्या अंशतः ढगाळ हवामानामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या वर गेले आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्यात झालेल्या अंशतः ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) किमान तापमानाचा पारा (Temperature) पुन्हा वाढू लागला आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या वर गेले आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Cold Weather : थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता

मंगळवारी (ता. २७) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १२ ते २० अंशांच्या दरम्यान कायम होता.

दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या पार आहे. मालदीव आणि कोमोरीन भागातील कमी दाब क्षेत्र निवळले आहे.

Weather Update
Weather Update : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट ओसरू लागली असून, आज (ता. २८) राजस्थानात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. राजस्थानातील चूरू येथे मंगळवारी (ता. २७) देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, ओडिशासह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे.

मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.० (१५.०), जळगाव ३०.८ (१५.५), धुळे ३०.० (११.०), कोल्हापूर ३१.१ (२१.२), महाबळेश्वर २७.२(१६.४), नाशिक ३०.५ (१२.४), निफाड ३०.४ (७.०), सांगली ३१.६ (२०.१), सातारा ३२.०(१६.६), सोलापूर ३३.२ (२०.७), सांताक्रूझ २९.५(१७.०), डहाणू २८.३ (१५.९), रत्नागिरी ३२.० (२१.०), औरंगाबाद ३०.१ (१३.६), नांदेड ३१.८ (२०.०), परभणी ३१.२ (१६.४), अकोला ३३.३ (१६.६), अमरावती ३२.८ (१६.०), बुलढाणा ३०.५ (१७.६), ब्रह्मपूरी ३२.८ (१७.८), चंद्रपूर ३०.८ (२०.४), गडचिरोली ३०.०(१४.८), गोंदिया ३०.८(१५.५), नागपूर ३०.४ (१७.१), वर्धा ३१.४(१७.९), यवतमाळ ३२.२ (१९.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com