Sugar MSP: साखरेची विक्री किंमत वाढवली तरच कारखानदारी टिकेल...

राज्यातील बरेचसे कारखाने एफआरपीपेक्षा जादा दर देतात. एफआरपी व त्यावरील प्रीमियम कशा पद्धतीने दिला पाहिजे, याबाबत नेमके सूत्र यावे.
Cooperative Conference
Cooperative Conference Agrowon

Sakal Cooperation conclave साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) (MSP) वाढत नसल्याने याचा फटका साखर कारखानदारांना (Sugar Industry) बसत आहे. एकीकडे ऊस उत्पादकांना एफआरपी द्यायचा दबाव आणि दुसरीकडे साखरेच्या (Sugar Rate) किमान विक्री मूल्यात सरकार वाढ करत नसल्याने साखर कारखाने संकटात जात आहेत.

एमएसपी आणि एफआरपीचा मेळ घालून साखर कारखानदारी टिकवायची असेल तर एमएसपीत वाढ झाल्याशिवाय पर्याय नाही, अशी अपेक्षा परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

Cooperative Conference
Cooperative Conference : आगामी दशक सहकाराचेच

‘साखर दराबाबत ऊस दराची संलग्नता’ या विषयावर आयोजित परिसंवादात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सल्लागार शिवाजीराव देशमुख, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना अंबडचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पुण्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आदींनी सहभाग घेतला.

उसाची उपलब्धता होण्यासाठी क्षमता नसतानाही कारखान्यांना एफआरपी द्यावी लागत असल्याने भविष्यात मोठे संकट उभे राहील, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. देशमुख म्हणाले, स्पर्धा निर्माण झाल्याने साखर कारखानदारी

Cooperative Conference
Cooperative Conference : उच्च उत्पादन क्षमतेकडे उसाची वाटचाल

अडचणीत आली आहे. सर्वच घटकांनी या बाबीकडे लक्ष द्यावे.

एफआरपी वाढत राहिली. मात्र एमएसपीचे दर किरकोळ प्रमाणात वाढल्याचा फटका कारखानदारीला बसला.

साखरेची विक्री व ऊस उत्पादकांना देण्याचा दर याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक कारखाने संकटात.

हंगामाच्या सुरुवातीला बँका एमएसपीचा आधार घेऊन मालतारण कर्ज देतात.

एफआरपीत वाढ होत असल्याने दरवर्षी जादा रक्कम द्यावी लागते.

मालतारण कर्ज मात्र तितकेच मिळते, ही तफावत कारखानदाराला नुकसानीत आणणारी आहे. केंद्राने एमएसपी एफआरपीला लिंक करावी.

राज्यातील बरेचसे कारखाने एफआरपीपेक्षा जादा दर देतात. एफआरपी व त्यावरील प्रीमियम कशा पद्धतीने दिला पाहिजे, याबाबत नेमके सूत्र यावे. बेसिक रिकव्हरी, ऊसतोडणी, वाहतूक खर्च, हंगामाची स्थिती पाहून एफआरपी देण्याचे नियोजन करणे शक्य आहे. मात्र भविष्यातील धोके टाळण्यासाठी केंद्राने एमएसपीत वाढ करण्याशिवाय पर्याय नाही.

- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com