Kharif Season 2023 : शेती मशागतीची दरवाढ

Agriculture Cultivation Cost : इंधन दरांमध्ये कोविडनंतर झालेली वाढ शेतीच्या मशागतीचा खर्च वाढविणारी ठरली आहे. यंदाही ट्रॅक्टरने मशागतीसाठी १० टक्के अधिकचा दर शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

Jalgaon News : इंधन दरांमध्ये कोविडनंतर झालेली वाढ शेतीच्या मशागतीचा खर्च वाढविणारी ठरली आहे. यंदाही ट्रॅक्टरने मशागतीसाठी १० टक्के अधिकचा दर शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे.

सततच्या पावसाने जमिनी कडक झाल्या आहेत. कोरडवाहू क्षेत्र धारकांसह बागायतदार किंवा कृत्रीम जलसाठाधारकांनाही जमिनीची खोल नांगरणी करावी लागत आहे. कारण पावसाने शेतात तण तयार झाले आहे.

Agriculture
Fertilizer Cost : खत आणि कीटकनाशकवरील खर्च नियंत्रित करावा लागेल

हे तण शेत भुसभुशीत किंवा रोटाव्हेटरने नष्ट होणार नाही. त्यासाठी खोल नांगरणी व नंतर रोटाव्हेटर करावे लागत आहे. यासाठी सध्या मागील हंगामाच्या किंवा वर्षाच्या तुलनेत १० टक्के अधिकचा दर द्यावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणखी वाढला आहे.

कुट्टी वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. खरिपाची वेळ किंवा पावसाचे दिवस नजीक आल्याने शेतकरी कुट्टी करून लागलीच ती घरानजीक, गोठ्यात साठवून घेत आहेत. त्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग वाढला आहे. यासाठी प्रति १० किलोमीटरला एक हजार ते १२०० रुपये दर आकारला जात आहे. ट्रकसाठीचे दर आणखी अधिक आहेत.

यातच जशी मजूरटंचाई आहे, तशी मशागत करणाऱ्या यंत्रणेची किंवा ट्रॅक्टरची टंचाई आहे. शेतकऱ्यांना मशागत करणाऱ्या ट्रॅक्टरची अनेकदा शोधाशोध करावी लागते. लहान शेतकऱ्यांसमोर ही समस्या अधिक आहे.

जशी शेतकऱ्यांसमोर समस्या आहेत, तशी भाडेत्त्वावर शेतीची मशागत करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांसमोरही कुशल चालक उपलब्ध न होण्याची समस्या आहे. या चालकांची मजुरीदेखील वाढली आहे.

रात्रपाळीसाठी ५०० रुपये आणि दिवसा ३५० रुपये मजुरी द्यावी लागते. तसेच भत्ता, खुशालीदेखील रोज द्यायची असते. कुशल चालक जेथे अधिकची मजुरी व भत्ते मिळतात, तेथे कामाची वाट धरतात, असेही ट्रॅक्टरमालकांचे म्हणणे आहे.

Agriculture
Agriculture Production Cost : शेतकऱ्यांनी पिकांच्या उत्पादन खर्चाची माहिती कळवावी

मळणीचा खर्चही अधिक

मळणीसाठीदेखील अधिकचा खर्च लागत आहे. मागील वेळेस मका मळणीसाठी प्रतिक्विंटल ७० ते ८० रुपये दर होता. यंदा हा दर ९० ते १०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. बाजरी मळणीसाठीदेखील १० टक्के अधिकचा खर्च लागत आहे.

वाहतूक खर्चही गृहीत धरा

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाहतूक खर्च गृहीत धरला जात नाही. पण आता वाहतुकीसंबंधीचा खर्च वाढला आहे. इंधन महागल्याने केळी वाहतुकीसाठी प्रतिघड किंवा एक घड शेतातून बाहेर किंवा रस्त्यावर केळी भरण्यासाठी उभ्या वाहनानजीक आणण्यासाठी १० रुपये दर द्यावा लागत आहे.

केळीबागेचे शेत आणि मुख्य रस्त्यावर केळी भरण्यासाठी उभे असलेले वाहन यातील अंतर १०० किंवा १५० मीटर असल्यास हा खर्च प्रतिघड १२ ते १३ रुपयांवर जातो. कलिंगड व इतर शेतमालाची थेट खरेदी किंवा बाजारातील खरेदीसंबंधीदेखील शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च १० ते १५ टक्के वाढला आहे.

मशागतीचे दर (रुपयांत व प्रतिएकर)

मशागतीचा प्रकार---२०२२---२०२३

नांगरणी---१२००---१३००

रोटाव्हेटर---८०० ते ९००---१०००

टिलर---६०० ते ७००---८००

केळी, कापूस पीक सऱ्या तयार करणे---८००---९००

शेतीची मशागत व इतर खर्च दरवर्षी वाढत आहेत. पण शेतमालाचे दर कमी होत आहेत. हा चमत्कार कसा व कोणामुळे घडत आहे, असा प्रश्न आहे. यामुळे शेती तोट्यात जात आहे.
- दिलीपभाई पटेल, शेतकरी, शहादा, जि. नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com