
सांगली ः जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून तुतीच्या क्षेत्रात (Mulberry Cultivation) वाढ होत आहे. यंदा ३१३ शेतकऱ्यांना ८१ हजार २५० अंडीपुंज दिले असून आतापर्यंत ५७ हजार ४५६ किलो कोषाचे उत्पादन (Silk Cocoon Production) घेतले आहे.
पुढील वर्षासाठी २४३ शेतकऱ्यांनी रेशीम शेती (Silk Farming) करण्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात पुढील वर्षी २४३ शेतकरी तुतीची लागवड (Mulberry Cultivation) करणार आहेत. कमी गुंतवणूक, खात्रीशीर व कायमची बाजारपेठ (Market), शासनाकडून हमीभाव (MSP) ही रेशीम उद्योगाची वैशिष्टे आहेत.
जिल्ह्यातील रेशीम विभागाने शेतकऱ्यांना तुतीची लागवड करण्यासाठी प्रोस्ताहित केले आहे. गावा-गावात जाऊन जनजागृती केली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढू लागला आहे. जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात ३१३ शेतकऱ्यांनी ३३० एकरावर तुतीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांनी ५७ हजार ४५६ किलो कोषाचे उत्पादन घेतले आहे.
जिल्ह्यातील प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यातील जत, कवठे महांकाळ तालुक्यांत रेशीम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत.
त्याचबरोबर वाळवा, मिरज, तासगाव तालुक्यांतही रेशीम प्रकल्प आहेत. तासगाव तालुक्यातील कवठे एकंद आणि खानापूर तालुक्यातील नागेवाडी याठिकाणी कोषापासून धागा निर्मितीचे कारखाने उभे आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील कोष उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. यामुळे अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
गेल्या तीन वर्षांतील तुतीची लागवड
वर्ष - शेतकरी संख्या - क्षेत्र - दिलेले अंडीपुंज - कोष उत्पादन (किलोत)
२०२०-२१ - ३८१- ३८६- ८६ हजार ८५० - ४९ हजार ८०९
२०२१-२२ - ४५३ - ४६६- ८९ हजार ५०० - ४८ हजार ५४९
२०२२-२३ - ३१३ - ३३० - ८१ हजार २५० - ५७ हजार ४५६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.