Kharif Sowing : पुणे विभागात पेरणीच्या क्षेत्रात वाढ

जुलैच्या सुरुवातीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

पुणे : जुलैच्या सुरुवातीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी नऊ लाख ६५ हजार ४८ हेक्टर म्हणजेच ८५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी असली तरी नगर जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

Kharif Sowing
सोलापुरात दोन लाख ८२ हजार हेक्टरवर खरिप पेरणीचे नियोजन

पुणे विभागात नगर जिल्ह्यात एक जून ते २२ जुलै या कालावधीत सरासरीच्या ९७.५ मिलिमीटरपैकी ९४.३ मिलिमीटर म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडला. तर पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी ३३९.८ मिलिमीटर म्हणजेच १२६ टक्के, तर सोलापूरमध्ये सरासरीच्या ९४.८ मिलिमीटरपैकी ११५.६ मिलिमीटर म्हणजेच १२१ टक्के पाऊस पडला. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

Kharif Sowing
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात आजपासून खरिप बियाण्यांची विक्री

जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ तालुक्यांमध्ये जोरदार तसेच वेल्हे तालुक्यात कमीअधिक पर्जन्याची नोंद झाली आहे. नगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात कुठेही दुबार पीक पेरणी झालेली नाही तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले नाही. बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, मका व कापूस पिके वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये सर्वदूर पावसामुळे भात पिकाच्या पुर्नलागवडीस सुरुवात झाली आहे. तर बाजरी पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात बाजरी, मूग, उडीद पिकांच्य पेरणी क्षेत्रात घट होऊन सोयाबीन पीक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सततच्या पावसामुळे पेरणी झालेले सोयाबीन पीक तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कुठेही दुबार पीक पेरणी झालेली नाही तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले नाही.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन, मका, तूर व भुईमूग पिके सद्यःस्थितीत वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्याचबरोबर बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रोप अवस्थेत आहे. दक्षिण सोलापूरमध्ये सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ दिसून आला आहे. सांगोला व दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ दिसून आला आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना एकात्मिक किड व्यवस्थापनासंबंधी उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये :

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणीचे क्षेत्र --- टक्के

नगर --- ५,७९,७६८ -- ५,४६,४०० -- ९४

पुणे --- १,९५, ७१० -- १,२९,०२६ --- ७९

सोलापूर --- २,८९,५७० -- २,२९,८६६ -- ७९

एकूण --- १०,६५,०४८ -- ९,०५,२९२ --- ८५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com