Soybean Crop : सोयाबीन क्षेत्रात १९ हजार हेक्टरने वाढ

पेरणी क्षेत्रात गतवर्षीच्या (२०२१) तुलनेत यंदा ५ हजार ५८२ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा सोयाबीन वगळता कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांचा पेरा घटला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात १९ हजार ८२२ हेक्टरने वाढ झाली आहे.
Soybean Crop
Soybean CropAgrowon

परभणी ः परभणी (Parbhani soybean) जिल्ह्यात यंदा (२०२२) खरीप हंगामात (Khareef Season) ५ लाख १० हजार ७२४ हेक्टरवर (९५.४८ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात गतवर्षीच्या (२०२१) तुलनेत यंदा ५ हजार ५८२ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा सोयाबीन (Soybean Crop) वगळता कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांचा पेरा घटला आहे.

Soybean Crop
Cotton Rate : हंगामात कापसाला किती दर मिळू शकतो | Agrowon | ॲग्रोवन

गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात १९ हजार ८२२ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदाच्या एकूण पेरणी क्षेत्रात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र ५२.८२ टक्के आहे. यंदाच्या खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र कृषी आणि महसूल विभागाकडून बुधवारी (ता. १४) अंतिम करण्यात आले त्यानुसार जिल्ह्यात सरासरी ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ५ लाख १० हजार ७२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्हि. डी. लोखंडे यांनी दिली.

Soybean Crop
Lumpy Scene Disease : लंपी रोगामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलं| Agrowon | ॲग्रोवन

गतवर्षीच्या (२०२१) खरीप हंगामात ५ लाख ५ हजार १४२ हेक्टरवर (९७.६८ टक्के) पेरणी झाली होती. यंदा सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ४९ हजार ७२७ हेक्टर असताना २ लाख ६९ हजार ८०० हेक्टरवर (१०८.०४ टक्के) पेरणी झाली आहे. कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ७९ हजार ४४७ हेक्टरवर (९३.३६ टक्के) लागवड झाली आहे. कपाशीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत १ हजार ६७८ हेक्टरने घट झाली आहे. तुरीची ४५ हजार ९५९ पैकी ३९ हजार ४८८ हेक्टरवर (८५.८२ टक्के) पेरणी झाली आहे.

गतवर्षीपेक्षा तुरीच्या क्षेत्रात यंदा ४ हजार ४२१ हेक्टरने घट झाली आहे. मुगाची २७ हजार १७८ पैकी १३ हजार १७१ हेक्टरवर (४८.४६ टक्के) पेरणी झाली असून ४ हजार १० हेक्टरने घट झाली. उडदाची ९ हजार ८० पैकी ४ हजार ६१६ हेक्टरवर (५०.८४ टक्के) पेरणी असून ६९३ हेक्टरने घट झाली. ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी २ हजार ६५४ हेक्टरवर (३६.१९ टक्के) पेरणी झाली असून १ हजार ८९१ हेक्टरने घट झाली. बाजरीची १ हजार १६७ पैकी २२३ हेक्टरवर (१९.१० टक्के), मक्याची १ हजार ३ पैकी ९९० हेक्टरवर (९८.६१ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची ९ हजार ८३१ पैकी ३ हजार ९५८ हेक्टरवर ४०.२६ टक्के) पेरणी झाली आहे.

कडधान्यांची ८२ हजार ३७५ पैकी ५७ हजार ३४४ हेक्टरवर (६९.६१ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्याची २ लाख ५० हजार ४८० पैकी २ लाख ६९ हजार ९७४ पैकी हेक्टरवर (१०७.७८ टक्के) पेरणी झाली आहे.

खरीप २०२२ तालुकानिहाय

पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ९७००० ८६४१९ ८९.०९

जिंतूर ९७८८४ ९८३५५ १००.४८

सेलू ६०५३२ ६१७३१ १०१.९८

मानवत ४२५९९ ४२४२४ ९९.५९

पाथरी ४४९५० ३७३८० ८३.१६

सोनपेठ ३५०३३ ३२९९० ९४.१७

गंगाखेड ५७८०७ ५७५०६ ९९.४८

पालम ४५६१६ ४३८९० ९६.२२

पूर्णा ५३४७६ ५००२८ ९३.५५

पीकनिहाय तुलनात्मक खरीप पेरणी स्थिती

(क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक २०२१ २०२२

सोयाबीन २४९९७८ २६९८००

कपाशी १८११५५ १७९४७७

तूर ४३९०९ ३९४८८

मूग १७१८१ १३१७१

उडीद ७४९३ ६८००

ज्वारी ४५४५ २६५४

बाजरी ५३६ २२३

मका ९९९ ९९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com