Jalgaon News: सूर्यफूल बियाणेदरात वाढ

खते, मजुरीचे दर, पाइप, ठिबक आदींच्या दरात वाढ होत असतानाच सूर्यफूल बियाणे दरही यंदा सुमारे पाच ते सहा टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सतत वाढत आहे.
Sunflower Seed Rate
Sunflower Seed Rate Agrowon

जळगाव ः खते, मजुरीचे दर, पाइप, ठिबक (Drip Irrigation) आदींच्या दरात वाढ होत असतानाच सूर्यफूल बियाणे (Sunflower Seed) दरही यंदा सुमारे पाच ते सहा टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च (Production Cost) सतत वाढत आहे.

Sunflower Seed Rate
Sunflower Production : खानदेशात सूर्यफुलाचे क्षेत्र वाढणार

खानदेशात सूर्यफुलाची लागवड मागील तीन वर्षांत सतत वाढली आहे. कमी कालावधीत बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सूर्यफुलास पसंती देत आहेत.

काही शेतकऱ्यांनी एकरी २५ क्विंटल उत्पादनही साध्य करण्यात सातत्य ठेवले आहे. त्यास दरही कमाल ७ हजार व किमान ५ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाले.

मागील खरिपातही चांगले दर राहिले. यामुळे लागवड वाढली आहे. २०२१ मध्ये सूर्यफूल बियाण्याचा काळाबाजार सुरू होता.

२०२२ च्या रब्बीतही अशीच स्थिती होती. सूर्यफूल बियाण्यास उठाव असल्याने त्याचा लाभ कंपन्यादेखील घेत आहेत.

Sunflower Seed Rate
Sunflower Production : जागतिक सूर्यफुल उत्पादन यंदाही घटणार

बियाणे दर वाढ झाली असून, दोन किलो बियाण्याचे एक पाकिट आता २६०० रुपयांना मिळत आहे. काही कंपन्यांचे बियाणे दर यापेक्षा अधिक आहेत.

बाजारात बियाण्याची कृत्रिम टंचाईदेखील आहे. बियाणे शिल्लक नाही, अशी अफवा काही मंडळी तयार करीत आहे. यातच बियाणे दरवाढ करण्यात आली आहे.

मागील रब्बी हंगामात बियाण्याची मागणी अधिक व पुरवठा कमी होता. कारण लागवड जळगाव जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर पोहोचली होती. यंदा बियाण्याचा पुरवठा बऱ्यापैकी आहे. परंतु बियाण्याची दरवाढ करण्यात आली आहे.

खानदेशात सूर्यफूल बियाण्याची मागणी सर्वत्र आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, चोपडा, भडगाव, एरंडोल, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, पाचोरा, रावेर, यावल, जळगाव या भागांतील काही महसूल मंडळांत बऱ्यापैकी पेरणी होत आहे.

धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार भागातही बियाण्यांची मागणी आहे.

मका बियाणे दरातही काही कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. असाच प्रकार सूर्यफूल बियाण्याबाबतही झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. उत्पादन खर्च वाढ आहे. शेतीमालाचे दर मात्र कमी आहेत.

- रमेश पाटील, शेतकरी, भडगाव, जि. जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com