Weather Update : तापमानात वाढ; गारठा झाला कमी

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभाव, किमान तापमानात झालेली वाढ, यामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. उन्हाचा चटका कायम असून, कमाल तापमान स्थिर आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या (Cold Wind) अभाव, किमान तापमानात (Temperature) झालेली वाढ, यामुळे राज्यात गारठा (Cold) कमी झाला आहे. उन्हाचा चटका कायम असून, कमाल तापमान स्थिर आहे. अंशतः ढगाळ आकाशामुळे (Cloudy Weather) उकाडा जाणवत आहे. आज (ता. ३०) राज्याच्या कमाल, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Weather Update : ढगाळ हवामानामुळे गारठा कमी

मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडी कमी-अधिक होत आहे. राजस्थानातील चुरू येथे मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Weather Update : तापमानातील वाढ कायम राहणार

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम आहे. मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया, उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३३.७ अंश तापमान नोंदले गेले.

उर्वरित राज्यात किमान तापमानातील वाढ कायम असून, बहुतांशी ठिकाणी पारा ११ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमान २८ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास कायम आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा जाणवत आहे. राज्यात आज (ता. ३०) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.६ (१५), जळगाव - (१२.३), धुळे ३१ (१०.५), कोल्हापूर ३०.६ (२२.८), महाबळेश्वर २५.५(१५.६), नाशिक ३१.१ (१३), निफाड ३१.२ (११.२), सांगली ३०.६(१५), सातारा ३०.६(२१.८), सोलापूर ३२.४ (१८.५), सांताक्रूझ ३३.७(१७), डहाणू ३०.१ (१६.५), रत्नागिरी ३२ (२२.२), औरंगाबाद ३१ (१२.३), नांदेड - (१५.२), उस्मानाबाद - (१८), परभणी ३१.८ (१४.१), अकोला ३२.८ (१५.३), अमरावती ३३ (१२.३), बुलडाणा - (१५.२), ब्रह्मपुरी ३१.३ (१३.१), चंद्रपूर - (१४.२), गडचिरोली ३०(१३), गोंदिया २९.२(११.२), नागपूर ३०.२ (१२.३), वर्धा ३०.२(१३.४), यवतमाळ ३१.५ (१५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com