Pest Management: योग्य कीड-रोग व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात वाढ

माळेगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Producer Organisation) स्थापना व भाजीपाला कीड व रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.
Pest Management
Pest ManagementAgrowon

सासवड (जि.पुणे) : सीताफळ व अंजीर पिके पुरंदरमधील महत्त्वाची फळपिके असून, योग्य पीक व्यवस्थापन (Crop Management) व कीड- रोग व्यवस्थापन (Pest Management) केल्यास उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांची उन्नती होईल. यासाठी शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन व कीड- रोग व्यवस्थापन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी केले.

दिवे (ता. पुरंदर) येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिवे गावचे सरपंच गुलाब झेंडे होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा. कृषी संजीवनी सप्ताह व कृषी दिनाची संकल्पना सांगून कृषी विभागाच्या महाडीबीटी, फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना (Gopinath Munde Accident Insurance Scheme) बाबत उपस्थित शेतकऱ्यांना सूरज जाधव यांनी मार्गदर्शन केले.

तसेच गटविकास अधिकारी अमर माने यांनी दिवे परिसरातील फळ प्रक्रिया उद्योग व शासकीय पुरस्काराबाबत शेतकऱ्यांचे कौतुक केले. अखिल भारतीय सीताफळ व अंजीर संशोधन केंद्र जाधववाडी येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दळवे यांनी सीताफळ लागवड तंत्रज्ञान विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. युवराज बालगुडे यांनी मार्गदर्शन केले.

Pest Management
Maize Production : मका उत्पादन वाढीसाठी सात जिल्ह्यात उपक्रम

तसेच कृषी विज्ञान केंद्र माळेगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Producer Organisation) स्थापना व भाजीपाला कीड व रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. फळमाशी कामगंध सापळा तयार करण्याचे प्रात्यक्षिक गणेश जगताप कृषी पर्यवेक्षक यांनी करून दाखवले. शेतकऱ्यांना आंबा कलमांचे वाटप मुक्ताई अग्रो सर्व्हिसेस सेंटर व उदयानी नर्सरी दिवे यांच्या मार्फत करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश पवार, कोंडिबा जरांडे, अमृता बोराटे तसेच मंडळ कृषी अधिकारी सासवडमधील सर्व कृषी सहायक दिवे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जगताप यांनी केले. आभार कृषी पर्यवेक्षक रवींद्र खेसे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com