Millet Year : पौष्टिक तृणधान्याची आहारातील व्याप्ती वाढवावी

तृणधान्य पिकांच्या उत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियोजन करण्यात यावे. अंगणवाडी, प्राथमिक शाळा व समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा, वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात तृणधान्यांचा अधिकाधिक समावेश करण्यात यावा.
Nutritious Cereal
Nutritious CerealAgrowon

नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) म्हणून राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांची आहारातील (Millet In Diet) व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टिने सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष-२०२२ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या वेळी बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा पर्यटन अधिकारी मधुमती सरदेसाई, समाज कल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी जयंत गायकवाड यांच्यासह आहारतज्ज्ञ आसोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. हिमानी पुरी, कळसुबाई शेतकरी मिलेट उत्पादक गटाच्या संचालक निलिमा जोरवर हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

गंगाथरन डी. म्हणाले, की तृणधान्य पिकांच्या उत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियोजन करण्यात यावे. अंगणवाडी, प्राथमिक शाळा व समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा, वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात तृणधान्यांचा अधिकाधिक समावेश करण्यात यावा.

Nutritious Cereal
Cereals Seed :तृणधान्यांचे बियाण्यासाठी ‘महाबीज’ची मदत घेणार

पौष्टिक तृणधान्य वर्षाची विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी इतर विभागांनाही सहभागी करून घेण्यात यावे. यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शासनाकडून तयार करण्यात आलेला लोगो सर्व शासकीय कार्यालयांनी वापरात आणण्यासाठी कृषी विभागाने परिपत्रक काढावे. तसेच त्या लोगोचे स्टीकर्स तयार करून इतर विभागांनाही उपलब्ध करून द्यावेत.

ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय शाळांच्या आवारातील भिंती व दर्शक स्थळे निश्चित करून त्याठिकाणी पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त घोषवाक्यांसह भित्तीचित्रे काढण्यात यावीत.

आदिवासी भागात आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आहाराचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने जनजागृती करण्यात यावी.

Nutritious Cereal
Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य क्रांतीसाठी...

नाशिकला होणार ‘मिलेट फूड फेस्टिव्हल’चे आयोजन

जिल्हा परिषदेमार्फत बचत गटांच्या माध्यमातून १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ‘मिलेट फूड फेस्टिव्हल’ आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. त्या फेस्टिव्हलमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा अशा विविध तृणधान्यांपासून तयार केलेले १०० पेक्षा अधिक पदार्थ ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या वेळी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com