कृषी अधिकाऱ्यांनी जागविला विश्वास

महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या घोगरवाडी (ता. किनवट) हे आदिवासी गोंड जमातीचे गाव आहे. ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामुळे या गावाच्या आत्मविश्वासाला नवी जोड मिळाली.
Agriculture
Agriculture Agrowon

नांदेड : महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या घोगरवाडी (ता. किनवट) हे आदिवासी गोंड जमातीचे गाव आहे. ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामुळे या गावाच्या आत्मविश्वासाला नवी जोड मिळाली. निमित्त होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या घोगरवाडीतील मुक्कामाचे. गावात दिवसभर थांबत शिवार फेरीतून पीक पद्धतीला समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. घोगरवाडीने या उपक्रमातून सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून विकसित करू असा आत्मविश्वास निर्माण केला.

Agriculture
Agriculture Technology : फळे -भाज्या राहणार दीर्घकाळ ताज्या

घोगरवाडी येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने कापूस व सोयाबीन या पिकावर अधिक भर देतात. गावाच्या चहूबाजूला डोंगर आणि झाडी आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने पाण्याची पातळीही बऱ्यापैकी आहे. जंगलात नीलगाय, हरिण, रानडुक्कर यांच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाला जवळ केले. मात्र, यातून आर्थिक स्थिती सुधारण्याची शाश्वती नाही. येथील शेतकऱ्यांना नवीन पीक पद्धती देणे, त्यांना अधिक उत्पादन घेता यावे यासाठी उच्च तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे आवश्यक होते.

Agriculture
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

शासनाच्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत प्रत्यक्ष कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना नवा मार्ग गवसला. यावेळी घोगरवाडी शिवारात सीताफळ, पेरू ही फळपिके चांगल्या पद्धतीने पिकतील. याशिवाय शेतकऱ्यांनी हळदी सारखे पीक घेण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. इथल्या जमिनीचा पोत चांगला असून सेंद्रिय खताच्या माध्यमातून या गावाला सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून विकसित करण्यात मोठा वाव असल्याचे रविशंकर चलवदे यांनी सांगितले. ज्योतिराम पांडुरंग तुमराम या आदिवासी शेतकऱ्यांच्या घरी रविशंकर चलवदे थांबले. तुमराम यांची चार एकर जमीन आहेत. नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात करायला तयार आहोत. शासनाने ज्या योजना दिल्या, त्याचा अधिक डोळस वापर करू असे त्यांनी सांगितले.

जंगली प्राण्यांपासून शेतीचे नुकसान

नीलगाय, हरण, रानडुक्कर या प्राण्यांपासून शेतीची नासाडी होते. याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या नियमानुसार शेत शिवाराच्या भोवताली मोठा चर करणे याबाबत शक्य-अशक्यता पडताळून पाहिली जाईल, असे त्यांनी सांगितले. येथे उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता सौर ऊर्जा आणि ठिबकसारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जवळ केले तर यात मोठा बदल साध्य करता येईल. याचबरोबर दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन या पूरक व्यवसायांना मोठा वाव असल्याचे रविशंकर चलवदे यांनी सांगून शेतकऱ्यांच्या मनात नवा विश्वास निर्माण केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com