विदर्भातील बाजार समित्यांमध्ये वाढली भुईमूगाची आवक

नागपूरच्या कळमणा बाजार समितीमध्ये शेंगाची आवक कमी असून ती अवघी २० ते २५ क्‍विंटलच्या घरात आहे. या ठिकाणी दरही कमी मिळत असून तो अवघा ३५०० ते ४००० रुपये असा आहे.
विदर्भातील बाजार समित्यांमध्ये वाढली भुईमूगाची आवक
Ground NutAgrowon

नागपूरः विदर्भातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी हंगामातील भुईमूंग शेंगाची आवक वाढती आहे. नागपूरच्या कळमणा बाजार समितीत आवक २० क्‍विंटल इतकी कमी असली तरी यवतमाळ, खामगाव (बुलडाणा), अमरावती, कारंजा (वाशीम), या बाजार समित्यांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीमध्ये शेंगाचा दर्जा पाहून दर मिळत असून काही ठिकाणी हमीभावापेक्षा कमी तर काही ठिकाणी अधिक दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगीतले.

उन्हाळी भुईमूंगाची विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा व नागपूरच्या काही भागात लागवड होते. स्थानिक व्यापाऱ्यांकडून शेंगाची खरेदी होत असली तरी भुईमूगावर आधारीत प्रक्रिया उद्योगांची संख्या गुजरातमध्ये अधिक असल्याने त्या भागातच खरेदी केलेल्या शेंगाचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले. नागपूरच्या कळमणा बाजार समितीमध्ये शेंगाची आवक कमी असून ती अवघी २० ते २५ क्‍विंटलच्या घरात आहे.

या ठिकाणी दरही कमी मिळत असून तो अवघा ३५०० ते ४००० रुपये असा आहे. अमरावती बाजार समितीत ओल्या शेंगाची आवक ३० क्‍विंटल तर दर ३००० ते ४००० रुपये असा आहे. वर्धा जिल्हयातील आष्टी बाजारात वाळलेल्या शेंगाची आवक ४५० क्‍विंटल तर दर ५००० ते ६५८० रुपये होते. काटोल (नागपूर) बाजारातील आवक ४४९ क्‍विंटल आणि दर ५००० ते ६६१०, कारंजा (वाशीम) बाजारातील आवक ९०० क्‍विंटल आणि दर ५३९० ते ६१७० होता.

अमरावती बाजारातील आवक ३१८ क्‍विंटल आणि दर ५००० ते ५८०० होता. यवतमाळ बाजारातील आवक २३ क्‍विंटल आणि दर ५१०५ ते ५४५० असा आहे. खामगाव बाजारात १४२५ क्‍विंटलची आवक आणि दर ४५०० ते ५९०० असा मिळाला. मानोरा बाजारात ४७५ क्‍विंटलची आवक नोंदविली गेली. या ठिकाणी ५००१ ते ६०५० असा दर होता. भुईमूगासोबतच कळमणा बाजारात इतर शेतमालाची नियमीत आवक होत आहे. त्यामध्ये हरभरा १००६ क्‍विंटल तर दर ४०५१ ते ४४५१ रुपये असा होता. सोयाबीन ५६०० ते ६६१० रुपये क्‍विंटल आणि आवक २३८ क्‍विंटलची होती.

कळमणा बाजारात फळे-भाजीपाला

कळमणा बाजार समितीत केळीची आवक आणि दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. आवक १३ क्‍विंटल आणि दर ४५० ते ५५० रुपये असे आहेत. बीट १०० क्‍विंटल आवक आणि दर १५०० ते २००० रुपये मिळाला. कारलीची आवक १२० क्‍विंटल तर दर ३५०० ते ४००० रुपये असा आहे. वांगी आवक ३०० क्‍विंटलची झाली.

वांग्याला १५०० ते १७०० रुपये असा दर मिळत आहे. ढोबळी मिरचीचे व्यवहार ४००० ते ४५०० रुपयांनी होत असून आवक ८० क्‍विंटलची आहे. गाजराची आवक वाढली असून ती ३०० क्‍विंटलवर पोचली आहे. २००० ते २५०० रुपयांनी गाजराचे व्यवहार होत आहेत. कोथींबीर २००० ते ४००० रुपये क्‍विंटल असून आवक ३०० क्‍विंटलच्या घरात आहे. मेथीचे दर ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटल असून आवक ६० क्‍विंटलची होती. फणस १८०० ते २००० रुपये क्‍विंटल असून त्याची आवक ३५० क्‍विंटलची आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com