Crop Productivity : पाच जिल्ह्यांत सर्वच पिकांची वाढीव उत्पादकता प्रस्तावित

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी सर्वच प्रमुख पिकांची वाढीव उत्पादकता मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी (Rabi Season) सर्वच प्रमुख पिकांची वाढीव उत्पादकता मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी काही धोरणही कृषी विभागाकडून (Agriculture Department) ठरविण्यात आली आहेत.

Wheat Procurement
Wheat Rate : मका, हरभरा, गहू फायदेशीर ठरणार

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ८६ हजार ६०७ हेक्टर इतके आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी १६ लाख ७९ हजार ३९६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या रब्बी हंगामात १५ लाख ६८ हजार २३४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. प्रस्तावित करण्यात आलेल्या रब्बी हंगाम क्षेत्रात १ लाख ६९ हजार २०० हेक्टरवर गहू, ३ लाख ३२ हजार ९०० हेक्टरवर रब्बी ज्वारी, १८००० हेक्टरवर रब्बी मका, ११ लाख २४ हजार ३०० हेक्टरवर हरभरा, २५ हजार ४०० हेक्टरवर करडई, ८०० हेक्टरवर सूर्यफूल, तर ११०० हेक्टरवर जवसाचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

...असे ठरविले धोरण

जवस व करडई पिकाखालील क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न

करडई पिकात यांत्रिकीकरण वापर वाढीसाठी प्रयत्न

हरभऱ्यासाठी टोकन पद्धतीने लागवडीवर देणार भर

हरभऱ्याचे जास्त उत्पादन देणाऱ्या व मोर रोगास प्रतिबंधक वाणाचा प्रसार

रब्बी पिकांमध्ये संरक्षित सिंचनासाठी तुषार सिंचनाच्या वापरासाठी प्रोत्साहन

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांमध्ये करणार जनजागृती

क्रॉप्सअपच्या माध्यमातून हरभऱ्यातील घाटे आळी नियंत्रणासाठी जनजागृती

पीकनिहाय गतवर्षीची व प्रस्तावित उत्पादकता (किग्रॅ/हेक्टरी)

पीक सरासरी गतवर्षीची प्रस्तावित

गहू १५१६ १६२५ १७५३

रब्बी ज्वारी १०६९ १०९९ १२४१

रब्बी मका १२२० १५७९ २२६७

हरभरा ९८७. १०७५ १२३८

करडई ६०१ ७०० ७८६

सूर्यफूल ४३९ ३७४ ९००

जवस २३५ ५३२ ५६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com