
परभणी ः कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयातील पदवीधर, नव उद्योजक, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गटातील सदस्य भविष्यात या इनक्युबेशन केंद्रात (Incubation Center) प्रशिक्षित होतील मराठवाड्यातील शेतीमाल प्रक्रिया उद्योग (Processing Industry) विकासात मोलाचा हातभार लावतील. यामुळे ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या संकल्पनेस चालना मिळेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयास पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (पीएमएफएमइ) मंजूर सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इनक्युबेशन सेंटर) इमारत बांधकामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. २०) कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक दिपाराणी देवतराज, अभियंता दीपक कशाळकर, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विद्यापीठ वास्तुविशारद युनूस, विभाग प्रमुख प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे, डॉ. कैलास गाढे, डॉ भारत आगरकर उपस्थित होते. इनक्युबेशन केंद्र उभारण्यास केंद्र सरकारकडून ३ कोटी २९ लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.