Wet Drought : ओल्या दुष्काळासाठी पाथरी येथे शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

पाथरी, जि. परभणी : अतिवृष्टीमुळे (Wet Drought) खरिपातील सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान (Soybean, Cotton Crop Damage) झाले असल्याने पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. खरिपातील काढणी चालू असलेल्या पिकांच्या नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान तसेच पीक विमा (Crop Insurance) देण्यात यावा

Wet Drought
Crop Damage : नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवासेना यांच्यातर्फे शनिवारी (ता. १५) सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण मंगळवारी ही (ता. १८) सुरू होते.

पाथरी तालुक्यातील पाथरी, बाभळगाव, हदगाव, कासापुरी या चार महसूल मंडलांतील सोयाबीन, कपाशी, तूर, ऊस, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे, निकष न लावता थेट हेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर करावी

ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध पक्षीय कार्यकर्त्यांसह स्थानिक अतिवृष्टिग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने साखळी उपोषणात सहभागी होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com