Tehsildar On Protest : राज्यात नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

राज्यात नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ यांनी ग्रेड पे बाबत सोमवार (ता. तीन) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
Tehsildar On Protest : राज्यात नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

Akola News Akola :राज्यात नायब तहसीलदार (Naib Tehsildar Protest) राजपत्रित वर्ग -२ यांनी ग्रेड पे बाबत सोमवार (ता. तीन) पासून बेमुदत कामबंद आंदोलन (Tehsildar Protest) सुरू केले आहे. यात सर्वच अधिकारी सहभागी झाले असल्याने दैनंदिन कामकाजाला फटका बसू लागला आहे.

या काळात निवडणूक, नैसर्गिक आपत्तीसारखी (Natural Calamity) महत्त्वाची प्रमुख कामे वगळता इतर कुठलीही कामे करणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

या बाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे.

परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदारांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन १९९८ पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.

मात्र, संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरून अद्यापही देण्यात आलेली नाही.

Tehsildar On Protest : राज्यात नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन
Agriculture Irrigation : ‘टेंभू’च्या पाणी नियोजनाचा फज्जा

संघटनेने नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ यांचे ग्रेड पे ४८०० रुपये करण्याच्या अनुषंगाने शासनाला यापूर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती.

परंतु महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी यासंदर्भात कुठलीही दखल घेतली नाही.

तत्कालीन महसूल मंत्री, वित्तमंत्री, अपर मुख्य सचिव यांच्यासह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.

Tehsildar On Protest : राज्यात नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन
Indian Agriculture : शेतजमिनी जिवंत करूया...

शिवाय के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष नायब तहसीलदारांचे ग्रेड पे ४८०० वाढविण्याबाबत सादरीकरण करूनही तसेच कामाचे स्वरूप जबाबदारी इत्यादी बाबींची सर्व माहिती असूनही मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

‘अधिक काम- अधिक वेतन’ या नैसर्गिक न्याय तत्त्वाने व शासनाच्या धोरणानुसार सदर मागणी ही रास्त व न्याय असूनही या बाबत शासन स्तरावरून विशेषतः महसूल विभागाकडून नायब तहसीलदाराच्या वेतन श्रेणीबाबत न्याय मिळाला नाही. त्यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

यामुळे राज्यात या संवर्गाच्या अधिकाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या अधिकाऱ्यांनी दिवसभर आंदोलनात सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com