भारतासाठी इथेनाॅल उत्पादन वाढविणे गरजेचे

Ethanol Production- २०२२ पर्यंत भारताची ९५० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता होती. त्यात २०२३ पर्यंत वाढ होऊन १२०० कोटी लीटरपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Ethanol Blending Program
Ethanol Blending ProgramAgrowon

पुणेः देशांतर्गत इथेनॉल उत्पादनाची गरज वाढत आहे. आजही इथेनॉल मिश्रण धोरणांतर्गत (Ethanol Blending Program) २० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १७०० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. मात्र सद्या देशात केवळ ८६७ कोटी लिटर इतकेच इथेनॉलचे उत्पादन होत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या आयातीवर अवलंबून राहणे, देशाला परवडणारे नाही. त्यामुळे आयातीवरील कमी केली पाहिजे. त्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे.

२०२२ पर्यंत भारताची ९५० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता होती. त्यात २०२३ पर्यंत वाढ होऊन १२०० कोटी लीटरपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सद्या देशात धान्य आधारित इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. त्यांची आठ वर्षापूर्वी इथेनॉलची वार्षिक क्षमता ९२ कोटी लिटर इतकी होती.

आजघडीला त्यात वाढ झाली असून वार्षिक २९८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती या प्रकल्पातून केली जाते. त्याचबरोबर मागील आठ वर्षांत मोलॅसिस आधारित कारखान्यांकडून ३५४ लिटर इथेनॉलची भर त्यात पडली आहे.

जर धान्य आधारित इथेनॉल क्षमता वाढत नसेल तर उसाच्या मोलॅसिस अर्थात मळीपासून इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवता येऊ शकते. त्यामुळे इथेनॉलच्या उत्पादनाची मागणी पूर्ण करण्यासाठी कुठलीही समस्या नाही, असे जाणकार सांगत आहेत.

महाराष्ट्राची वार्षिक इथेनॉल क्षमता २५० कोटी लीटर आहे. त्यापैकी २१६ कोटी लीटर मळीवर आधारित आहे. केंद्राच्या योजनेचा लाभ घेत महाराष्ट्रातील ३७ कारखान्यांनी इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १३५ सहकारी कारखान्यांना परवानगी दिलेली आहे.

Ethanol Blending Program
साखरेपासून इथेनाॅल निर्मितीला मान्यता

केंद्र सरकारने अलीकडेच इथेनॉल उत्पादनासाठी अनुदानची योजना सुरू केली. मात्र त्यामध्ये धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पाची संख्या आधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात १७० कोटी लिटर इथेनॉलची भर पडणार आहे. मात्र इथेनॉल मिश्रण धोरणानुसार २० टक्क्याचे उदिष्ट गाठण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन वाढवावे लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com