संरक्षण उत्पादनांत भारत ‘आत्मनिर्भर’ ः मोदी

जागतिक पातळीवर शस्त्रांच्या निर्मितीमध्ये काही मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व असताना देखील भारताने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
Narendra Modi
Narendra ModiAgrowon

गांधीनगर (वृत्तसंस्था) ः भारतीय सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर स्वदेशी बनावटीची शस्त्रसंपदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय हा आत्मनिर्भर भारताची क्षमता दाखविणारा आहे. जागतिक पातळीवर (International level) शस्त्रांच्या निर्मितीमध्ये काही मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व असताना देखील भारताने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केले. यातून शस्त्रनिर्मितीमधील भारताचा वाढत जाणारा आत्मविश्वास दिसून येतो, असेही ते म्हणाले.

Narendra Modi
Rice Export : भारत ठरला चीनचा मुख्य तांदूळ पुरवठादार

गांधीनगर येथे आयोजित ‘संरक्षण प्रदर्शन-२०२२’ च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, की भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात २०२१-२२ मध्ये तेरा हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून येत्या काही दिवसांमध्ये आम्हाला चाळीस हजार कोटी रुपयांचे ध्येय गाठायचे आहे. मोदींच्या हस्ते या वेळी भारत- पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या उत्तर गुजरातमधील बनासकांठा येथे दिसा या नव्या हवाई तळाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला.

Narendra Modi
Bharat Jodo : शरद पवार आणि उद्धव ठाकरे 'भारत जोडो'मध्ये सहभागी होणार

देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने एक प्रभावशाली केंद्र म्हणून हे हवाई तळ ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या आधी आपण कबुतरांना सोडत असू आता चित्त्यांना सोडत आहोत, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी या वेळी सागरी सुरक्षा आणि अंतराळ तंत्रज्ञानाचे महत्त्वदेखील विशद केले. आंतरराष्ट्रीय व्यापाराला असलेली जागतिक सुरक्षा, सागरी सुरक्षा हे प्राधान्यक्रमाचे विषय म्हणून पुढे आले आहेत. जागतिकीकरणाच्या काळामध्ये मर्चंट नेव्हीची भूमिकादेखील आमूलाग्र बदलली आहे, असेही मोदी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com