भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही

आजच्या ‘आत्मनिर्भर भारत’वर कोणीही दबाव आणू शकत नाही. आपण कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतो. आम्ही दबावाखाली कोणताही निर्णय घेणार नाही. भारत ‘वसुधैव कुटुंबकम’चे पालन करतो.
भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही
Piyush GoyalAgrowon

वृत्तसंस्था: जिनिव्हा येथे भारत प्रमुख सदस्य असलेल्या विकसनशील देशांच्या जी ३३ च्या मंत्रिस्तरीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी (ता. १२) सांगितले, की भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे रविवारी (ता. १२) तब्बल पाच वर्षांनी मंत्रीस्तरीय बैठक सुरू झाली. या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व मंत्री पीयूष गोयल करत आहेत. जी ३३ मंत्रीस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत गोयल यांनी सांगितले, की त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने शाश्वत विकास उद्दिष्टांची मूलभूत तत्त्वे लक्षात घेऊन समान हिताच्या विविध मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडली.

Piyush Goyal
उष्णतेच्या लाटेमुळे कोळशाच्या किंमतीमध्ये वाढ

गोयल यांनी जागतिक व्यापार संघटनेचे (डब्ल्यूटीओ) महासंचालक, नागोझी ओकोंझो आयवेला यांच्याशी अन्न सुरक्षेसाठी सार्वजनिक स्टॉक होल्डिंगवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या शक्यतांसंदर्भात चर्चा केली. जी ३३ मंत्रिस्तरीय बैठकीत, विकसनशील देशांच्या युती ज्यामध्ये भारत प्रमुख सदस्य आहे, मंत्री पीयूष गोयल यांनी विकसनशील आणि अल्प विकसित राष्ट्रांमधील त्यांच्या समकक्षांशीदेखील विस्तृत चर्चा केली. मंत्री गोयल अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताय यांचीही भेट घेणार आहेत.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आजच्या ‘आत्मनिर्भर भारत’वर कोणीही दबाव आणू शकत नाही. आपण कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतो. आम्ही दबावाखाली कोणताही निर्णय घेणार नाही. भारत ‘वसुधैव कुटुंबकम’चे पालन करतो. आम्ही शाश्वत विकास उद्दिष्टांची मूलभूत तत्त्वे लक्षात घेऊन आमची भूमिका मांडली. आम्ही विकसनशील आणि अविकसित देशांबाबत चिंता व्यक्त केली. देशातील सर्व भागधारकांच्या हितसंबंधांचे तसेच डब्ल्यूटीओसह बहुपक्षीय मंचांवर भारताच्या नेतृत्वाकडे पाहणाऱ्या विकसनशील आणि गरीब राष्ट्रांच्या हिताचे रक्षण करण्यात भारताचा महत्त्वाचा वाटा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com