Pollution : भारतीयांचा श्‍वास प्रदूषित वातावरणात गुदमरला!

भारतातील ९९ टक्के लोकसंख्या प्रदूषित वातावरणात राहत असल्याचे ग्रीन पीस इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.
Air Polltion
Air PolltionAgrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील ९९ टक्के लोकसंख्या प्रदूषित वातावरणात (Polluted Atmosphere) राहत असल्याचे ग्रीन पीस इंडियाच्या (Greenpeace India) अहवालात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (Word Health Organization) आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनेत श्‍वसनयोग्य हवेतील पीएम २.५ कणांचे प्रमाण दिले आहे. मात्र या प्रमाणापेक्षा पाच पट अधिक कण असलेल्या प्रदूषित हवेत (Polluted Air) भारतीय श्‍वास घेत असल्याचे म्हटले आहे.

Air Polltion
Climate Change:हवामान बदलामुळेच गहू उत्पादन घटले?

‘डिफरंट एअर अंडर वन स्काय’च्या मथळ्यासह ग्रीन पीस इंडियाचा नवीन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातील निष्कर्षानुसार, भारतातील ९९ टक्के लोकसंख्या जागतिक आरेाग्य संघटनेने निश्‍चित केलेल्या श्‍वसनयोग्य पातळीपेक्षा अधिक प्रदूषित वातावरणात राहत आहेत. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ५६ टक्के लोकसंख्या आणि ६२ टक्के गर्भवती सर्वाधिक प्रदूषित भागात राहत आहेत.

Air Polltion
Water Pollution: जलप्रदूषणामुळे पंजाबला शंभर कोटींचा दंड

देशात सर्वाधिक प्रदूषण दिल्ली-एनसीआरमध्ये असल्याचे नमूद केले आहे. प्रदूषित वातावरणाच्या संपर्कात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि गर्भवतींना सर्वाधिक फटका बसत असल्याचे म्हटले आहे. देशातील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच प्रदूषणाचे सार्वजनिक रुपातून वेळोवेळी आकडेवारी जारी करणेदेखील गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. खराब वातावरणाच्या दिवसांत आरोग्य मार्गदर्शिका आणि रेड अलर्ट जारी करायला हवे. या आधारावर नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतील. देशातील नॅशनल एम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्‌सची (एनएएक्यूएस) व्यवस्था अपुरी असून, त्यात तत्काळ सुधारणा करण्याची गरज आहे, अशी आशा व्यक्त केली आहे.

पीएम.२.५ चा अर्थ

पीएम २.५ चा संबंध हवेतील सूक्ष्म कणांशी असून, ते आपल्या शरिरात प्रवेश करतात. वातावरणात यापेक्षा अधिक प्रमाणात कण असतील तर फुफ्फुस आणि श्‍वसनमार्गावर सूज येते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि हृदय तसेच श्‍वसनासंबंधीचे विकार होण्याचा धोका बळावतो. त्यामुळे यापेक्षा अधिक कण वातावरणात असतील तर त्यापासून आरोग्यावर परिणाम होतो. केंद्रीय प्रदूषण मंडळाने शास्त्रीय आधारावर एनएएक्यूएसमध्ये सुधारणेसाठी पुढाकार घ्यायला हवा. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमानुसार (एनसीएपी) स्वच्छ हवेसंदर्भातील नियोजित उपक्रम कार्यान्वित करायला हवेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com