Bhutan- भूतानला भारताचे कृषी क्षेत्रात सहकार्यः तोमर

भूतानचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाचे स्वागत करताना तोमर यांनी दोन्ही देशांच्या दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला भूतान हा पहिला देश होता.
Narendra Singh Tomar
Narendra Singh TomarAgrowon

भारतानं भूतानला कृषी क्षेत्रात (India's Cooperation To Bhutan In agriculture Sector) सर्वतोपरी सहकार्य केलं आहे. यापुढे देखील भूतानला भारताचं सहकार्य कायम राहील, असे मत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले. भूतानचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाचे स्वागत करताना तोमर यांनी दोन्ही देशांच्या दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भेट दिलेला भूतान हा पहिला देश होता. यामधून आपले मजबूत संबंध अधोरेखित होत असल्याचे तोमर यावेळी म्हणाले.

Narendra Singh Tomar
खानदेशात पीके पाण्याअभावी कोमजली

भूतानचे आर्थिक व्यवहार मंत्री लोकनाथ शर्मा यांनी नवी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी तोमर म्हणाले की, दोन्ही देशांमधील व्यापारी भागीदारी देखील मजबूत झाली आहे. आपले संबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी भारत अनुकूल आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि अन्य मंत्रालये भूतान बाबत रचनात्मक निर्णय घेत आहेत. आम्ही भूतानमधील विविध कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्यावर देखील काम करत आहोत.

Narendra Singh Tomar
अस्मानी संकटाला सामोरा जाणारा डोळस भूतान

ही मैत्री मजबूत करण्यासाठी भारताने उदारपणे सहकार्य केले आहे. दोन्ही देशांची व्यापारी भागीदारीही मजबूत झाली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळात हे संबंध आणखी घट्ट होतील. दोन्ही देश कृषी क्षेत्रात सहकार्य करत राहतील. अंतर्गत आणि बाह्य परिस्थिती पाहता आम्ही भूतानच्या विनंतीला आवश्यकतेनुसार सकारात्मक प्रतिसाद देऊ, अशी ग्वाही तोमर यांनी यावेळी दिली.

भूतानचे मंत्री शर्मा यांनी भूतानला साखर पुरवण्यासह विविध गोष्टींमध्ये भारताने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. शेतीचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे असून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी आम्ही भारतात आलो असल्याचे त्यांनी नमूद केले.

आले आणि बटाट्याच्या निर्यातीसाठी भूतानच्या विनंतीला मान दिल्याबद्दल शर्मा यांनी भारताचे आभार मानले. भारताला सुपारी निर्यात करण्याच्या भूतानच्या विनंतीवर लवकरात लवकर विचार करण्यात यावा. तसेच फळे आणि भाज्यांचा व्यापार सुरू ठेऊन मुक्त व्यापाराद्वारे द्विपक्षीय संबंध वाढवावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com