Indumil Statue : इंदूमिल स्मारकाला गती देणार

उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती
Indumil Statue | Ambedkar statue
Indumil Statue | Ambedkar statueAgrowon

इंदूमिल स्मारकाला गती देणार
-----
उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः मुंबईच्या इंदूमिलमध्ये (Indumill) प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आराखड्यात बदल करण्यात आल्याने हे काम रखडले होते. त्याला गती देत लवकरच ते पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत गुरुवारी (ता. २९) दिली.

Indumil Statue | Ambedkar statue
Farmers' yarn mills : चार महिन्यांपासून बंद शेतकरी सूतगिरणी सुरू

विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. इंदू स्मारकामधील कामाचा १६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यावेळी ११ टक्‍के पुतळा पूर्ण झाल्याचे निरीक्षण आहे.

Indumil Statue | Ambedkar statue
Sugar Mill : श्री दत्त कारखाना एकरकमी एफआरपी देणार

पाच मीटरची बेसमेंट वाढवायची आहे. त्यामुळे काम रखडले आहे. एकूण बेसमेंटसह ४५० फूट असून मुळ पुतळा ३५० फूट आहे. आजवर या कामासाठी २६६ कोटी रुपयांचा खर्च झाला. ३६६ कोटी रुपयांचा निधी याकरिता देण्यात आला आहे. १०० कोटी अद्यापही अखर्चीत आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com