Cotton Disease : अकोला जिल्ह्यात कपाशी पिकावर ‘दहिया’चा प्रादुर्भाव

जिल्ह्यात कपाशीच्या पिकावर अनेक ठिकाणी ‘लाल्या’ विकृतीची समस्या तयार झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
Cotton Crop Disease
Cotton Crop DiseaseAgrowon

अकोला ः जिल्ह्यात कपाशीच्या पिकावर (Cotton Crop Infestation) अनेक ठिकाणी ‘लाल्या’ विकृतीची समस्या तयार झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विविध ठिकाणी भेटी देऊन निरीक्षण केले असता हा दहिया किंवा पानांवरील पांढरे तांबडे डाग अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट झाले. हा रोग रॅम्युलेरिया एरिओलाय (रॅम्युलॅरिया गॉसिपाय) या बुरशीमुळे होतो.

Cotton Crop Disease
Bhima Co-operative Sugar Factory : भीमा’च्या निवडणुकीत खासदार महाडीकांना विरोधकांचे आव्हान

जिल्ह्यात यंदा कपाशीची लागवड वाढली आहे. पिकाची स्थिती चांगली होती. मात्र पाऊस उघडल्यानंतर आता ठिकठिकाणी कपाशीचे पीक लालसर दिसू लागले आहे. शेतकरी हा लाल्या विकृतीचा प्रकार असल्याचे सांगत होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अकोला व परिसरातील प्रक्षेत्रासह तसेच मानोरा, कारंजा लाड, शेलू, मानोरा, बार्शीटाकळी, मंगरूळपीर, महान, दर्यापूर, म्हैसांग, दहीहांडा, अकोट या परिसरांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून आला. हा रोग अमेरिकन कपाशीवरही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

...ही आहेत प्रमुख लक्षणे

सुरुवातीला पानांवर खालील बाजूने अनियमित, टोकदार पांढरट ठिपके पानांच्या शिरांभोवती आढळून येतात. तसेच पानावर सुरुवातीला तांबडे डाग दिसतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पानावर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात. यामुळे या रोगास दहिया हे नाव पडले आहे. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस अधिक प्रादुर्भाव. रोगाचे प्रमाण अधिक असेल तर पाने करपून गोळा होऊन वाळून गळून पडतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com