Soybean : सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

हिंगोली, परभणी जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर पाने खाणाऱ्या विविध प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांनी केले आहे.
Soybean
SoybeanAgrowon

हिंगोली ः हिंगोली, परभणी जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) पिकांवर पाने खाणाऱ्या विविध प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी (Pest Control Soybean) एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा (Integrated Pest Management Method) अवलंब करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांनी केले आहे.

Soybean
Soybean : सोयाबीन, हळद, कापसाच्या किमतींत घट

सोयाबीनचे पीक सध्या फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक भागातील सोयाबीनवर पाने खाणारी लष्करी अळी, उंट अळी, केसाळ अळी आदींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अनेक भागात चक्री भुंगा तसेच कोवळ्या शेंगावर घाटे अळीचा प्रादुर्भाव देखील आढळून येत आहे.

या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी पिकांमध्ये पक्षी थांबे लावावे. लष्करी अळी तसेच घाटे अळीच्या पतंगासाठी कामगंध सापळे लावावेत. आर्थिक नुकसान पातळी ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत यांनी सांगितले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com