
Pakistan Inflation News लाहोर (वृत्तसंस्था) ः पाकिस्तानातील महागाईचे संकट (Inflation Crisis In Pakistan) अधिक गहिरे होऊ लागले असून ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर (Inflation Rate) ३५.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाकडून शनिवारी (ता. १) याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आल्यानंतर अर्थतज्ज्ञांची झोप उडाली आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये अन्नधान्यासाठी झालेल्या दंगलीमध्ये आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर ३१.५ टक्के होता त्यात मार्चमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अन्नधान्य, शीतपेये आणि वाहतूक कमालीची महागली असून त्यामध्ये पन्नास टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
मागील काही वर्षांमध्ये या किमती प्रचंड वाढल्याचे दिसून येते. सरकारने नागरिकांना स्वस्त दरामध्ये पीठ मिळावे म्हणून विविध ठिकाणांवर वितरण केंद्रे उभारली आहेत पण या केंद्रांवरही सावळागोंधळच दिसून येत आहे.
मागील काही दिवसांमध्ये या केंद्रांवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पाच महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी पिठाची वाहतूक करणाऱ्या गाड्या लोकांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पाकिस्तानच्या परकी चलनसाठ्यानेदेखील तळ गाठला असून केवळ चार आठवडे पुरेल एवढाच चलनसाठा या देशाकडे उपलब्ध असून भविष्यात या देशाकडून होणारी आयात देखील पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.