Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील घट कायम आहे. शुक्रवारी (ता. १०) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Weather Update
Weather UpdateAgrowon

Latest Weather Update पुणे : किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाल्याने थंडी (Cold) कमी झाली असतानाच, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा (Heat) चटका असह्य झाला आहे.

कमाल तापमान ३४ अंशांपार गेल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील घट कायम आहे. शुक्रवारी (ता. १०) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे आणि जळगाव येथेही किमान तापमानाचा पारा १० अंशांवर होता. किमान तापमानतील वाढ आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पारा पुन्हा घसरण्याचा अंदाज आहे.

Weather Update
Weather Update : राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून, राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे गेला आहे.

सांताक्रूझ येथे पारा ३६ अंशांच्या वर तर निफाड आणि सोलापूरमध्ये ३५ अंशांवर पोचला आहे. कमाल आणि किमान तापमानात १३ ते २५ अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे गारठा असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा असह्य होत आहे.

Weather Update
Weather Update : पहाटे गारठा, दुपारी चटका

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. १०) मध्य प्रदेशातील रेवा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.११) पश्चिम बंगालचा उत्तरेकडील भाग, आसाम, मेघालय, त्रिपूरा राज्यात धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.२ (११.४), जळगाव ३४.६ (१०.०), धुळे ३४.०(१०.०), कोल्हापूर ३२.८(१८.३), महाबळेश्वर ३१.० (१५.९), नाशिक ३४.७ (१२.५), निफाड ३५.० (९.५), सांगली ३४.८ (१६.९), सातारा ३४.० (१४.४), सोलापूर ३५.८ (१६.२),

सांताक्रूझ ३६.४ (१८.६), डहाणू ३२.१ (१६.७), रत्नागिरी ३७.४(१८.३), औरंगाबाद ३३.२ (१०.२), नांदेड - (१५.२), परभणी -(१३.६), अकोला ३५.४ (१२.९), अमरावती ३३.४(१३.४), बुलढाणा ३२.०(१५.६), ब्रह्मपूरी ३४.१ (१३.८),

चंद्रपूर ३२.०(१५.६), गडचिरोली ३२.०(१२.०), गोंदिया ३१.५ (१२.२), नागपूर ३२.९ (१२.२), वर्धा ३२.८(१४.०), यवतमाळ ३३.५ (१४.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com