Agriculture Inputs : ‘महाआयटी’च्या निष्काळजीमुळे अडकले निविष्ठा परवाने

‘महाआयटी’च्या निष्काळजीपणामुळे राज्यातील निविष्ठा विक्रीचे हजारो ऑनलाइन परवाने अडकून पडले आहेत.
Agriculture Inputs
Agriculture InputsAgrowon

Pune News ‘महाआयटी’च्या (MahaIT) निष्काळजीपणामुळे राज्यातील निविष्ठा विक्रीचे (Agriculture Inputs) हजारो ऑनलाइन परवाने अडकून पडले आहेत. अखेर आयुक्तांनी हस्तक्षेप केल्यामुळे आतापर्यंत १९ हजार जिल्हास्तरीय परवान्यांचे वितरण करण्यात आले आहे.

खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी जिल्हास्तरावरील परवाने ऑफलाइन दिले जात होते. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली जात होती.

तसेच विक्रेत्यांचा छळदेखील केला जात होता. परवान्याची जुनी पद्धत सहा डिसेंबर २०२१ पासून बंद करण्यात आली. नवे परवाने ऑनलाइन देण्यास राज्यभर सुरुवात झाली होती.

तथापि, ‘महाआयटी’ने या कामासाठी कृषी विभागाला पुरविलेले सर्व कर्मचारी अचानक बदलण्यात आले. मनुष्यबळ नसल्यामुळे परवान्याचे वितरण रखडले. यामुळे विक्रेते हैराण झाले होते.

Agriculture Inputs
Agriculture Warehouse : उत्पादनांच्या साठवण सुविधांचा लाभ कसा घ्यावा?

कृषी संचालक विकास पाटील यांनी हा मुद्दा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासमोर मांडला. आयुक्तांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘महाआयटी’च्या तंत्रज्ञांची बैठक घेतली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

“ऑनलाइन परवाना कामकाजाची प्रणाली तयारी करताना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. मात्र, त्याबाबत वारंवार सांगूनदेखील सुधारणा होत नाही. आता हे अति झाले असून सुटसुटीत प्रणाली तयार करा,” अशा शब्दांत आयुक्तांनी कानउघाडणी केली.

त्यामुळे ऑनलाइन परवाना प्रणालीसाठी ९ तंत्रज्ञांचा चमू नव्याने देण्यात आला आहे. या तंत्रज्ञांनी सातत्याने परिश्रम घेत रखडलेल्या २५ हजार परवान्यांवर काम सुरू केले. त्यातील १९ हजारांपेक्षा जास्त परवान्यांचे आता वितरण झाले आहे. सर्व अडथळे दूर करून परवाना वितरणाची प्रलंबित स्थिती शून्यावर (झिरो पेंडन्सी) नेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : ‘सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड’ शेती निविष्ठा उत्पादनातील एक विश्‍वासाचं नाव

ऑफलाइनचा प्रस्ताव नाहीच

आर्थिक देवघेवीला चालना मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धत बंद करण्याच्या हालचाली कृषी आयुक्तालयात चालू आहेत, अशी जोरदार चर्चा सध्या निविष्ठा उद्योगात आहे. मात्र गुणनियंत्रण विभागाने या चर्चेचे खंडन केले आहे.

“‘महाआयटी’चे तंत्रज्ञ नसल्यामुळे परवाना वितरण रखडले होते. त्यात गुणनियंत्रण कर्मचाऱ्यांचा दोष नाही. ऑफलाइन पद्धत आणली जात असल्याची चर्चा बिनबुडाची आहे.

उलट ऑनलाइन परवाना प्रणाली पारदर्शक व जलद सेवेसाठी उत्तम ठरते आहे. त्यामुळे आमचे प्रयत्न ऑनलाइन पद्धत बंद करण्याचे नव्हे; तर ती अधिक सुटसुटीत करण्याचे सुरू आहेत,” असा युक्तिवाद एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- ‘महाआयटी’चे कृषी विभागाला पुरविलेले कर्मचारी अचानक बदलले

- तंत्रज्ञांअभावी परवान्याचे वितरण रखडले

- आता ९ तंत्रज्ञांचा नवा चमू मिळाल्याने अडथळे दूर होताहेत दूर

- रखडलेल्या २५ हजार परवान्यांवर काम सुरू

- १९ हजारांपेक्षा जास्त परवान्यांचे झाले वितरण

- वितरणाची प्रलंबित स्थिती शून्यावर नेण्याचे प्रयत्न

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com