Koradi Dam : ‘पेनटाकळी, कोराडी धरणाची चौकशी करा’

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी व कोराडी प्रकल्पात कोट्यवधी निधी खर्च होऊनही दोन्ही प्रकल्प अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांना हवा तसा फायदा मिळालेला नाही.
Koradi Irrigation
Koradi IrrigationAgrowon

डोणगाव, जि. बुलडाणा : मेहकर तालुक्यातील पेनटाकळी व कोराडी प्रकल्पात (Pentakali, Koradi Project) कोट्यवधी निधी खर्च होऊनही दोन्ही प्रकल्प अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांना हवा तसा फायदा मिळालेला नाही. या प्रकल्पांची उच्चस्तरीय व सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना श्री. सावजी यांनी पत्र पाठवले आहे. पत्रात श्री. सावजी यांनी म्हटले की, दोन तीन वर्षात नापिकीमुळे पाणीपट्टी शेतकरी भरू शकले नाही.

Koradi Irrigation
Rabi Irrigation : चास-कमान धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडले

पाणीपट्टी थकीत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज केले नाहीत. अधिकाऱ्यांनी थकबाकी भरल्याशिवाय पाण्यासाठी शेतकरी अर्ज करू शकत नाहीत, असे आधी सांगितले होते.

Koradi Irrigation
Irrigation : खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न होणार

सध्या, दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. ज्या मार्गाने पाणी सोडायचे ते मार्ग पूर्णपणे विस्कळित झाले आहेत. थातुरमातूर दुरुस्ती केल्या जाते, ही दुरुस्ती टिकत नाही व यामुळे शेतकऱ्यांनी पाणी घेतले तरी, याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.

या प्रश्‍नांवर शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. तेव्हा लेखी आश्वासने देवून वेळ काढल्या गेली. अनेकदा या प्रकल्पातील पाणी मोकळे सोडून द्यावे लागते, असेही सावजी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तत्काळ उच्चस्तरीय चौकशी होणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com