खते, बियाणे दुकानात 'कृषी'कडून तपासणी

लिंकिंग केल्याचे उघड; अनेकांना बजावल्या नोटिसा
खते, बियाणे दुकानात 'कृषी'कडून तपासणी
Fertilizer Agrowon

जळगाव ः खते व कापूस बियाण्यांतील काळाबाजार (Cotton Seed Black Marketing), लिंकिंग (Linking), जादा दरातील विक्री व कृत्रीम टंचाई (Technical Shortage) ‘अॅग्रोवन’ने समोर आणली. त्यानंतर कृषी विभागाने कारवाईसत्र, तपासणी हाती घेतली आहे. जिल्हाभरात खते व बियाणे विक्रेत्यांची (Seed Seller) तपासणी, झाडाझडती घेण्यात आली. यात खतांवर लिंकिंग केल्याचे अनेक खत विक्रेत्यांच्या बिल नोंदवहीतून दिसून आल्याची माहिती आहे.

एन हंगामात जिल्ह्यात खते व कापूस बियाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचा मुद्दा ‘अॅग्रोवन’ने समोर आणला. त्याबाबत बुधवारी (ता.१५) व गुरुवारी (ता.१६) सलग दोन दिवस सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. यामुळे कृषी यंत्रणा खळबळून जाग्या झाल्या. गुरुवारी आणि शुक्रवारी (ता.१७) सकाळपासून जिल्हाभरात खते व बियाणे विक्रेत्यांकडे तपासणीसत्र राबविण्यात आले. यात साठा, बिल नोंदवही, साठाफलक व इतर बाबींची माहिती घेण्यात आली. त्यात जळगाव शहरात काही खत विक्रेत्यांकडे झालेल्या तपासणीत खतांवर लिंकिंग केल्याचे समोर आले आहे.

आठ ते नऊ हजार रुपयांच्या खतांवर अडीच ते तीन हजार रुपयांच्या इतर किंवा अनावश्यक खतांची विक्री संबंधित शेतकऱ्यांना केल्याचेही बिल नोंदवहीतून दिसून आले आहे. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच खुलासे मागविण्यात आले आहेत. परवाना रद्द करण्याची तंबी जागेवरच तपासणी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रावेर, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागांतही खते विक्रेत्यांनी लिंकिंग केल्याचे आढळून आले आहे. संबंधितांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या. या तपासणीसाठी संबंधित तालुक्यातील कृषी विभाग व आत्माच्या अधिकाऱ्यांची पथक गठित करण्यात आले होते. दिवसभर तपासणी करण्यात आली. बियाणे विक्रेत्यांचीदेखील कसून तपासणी केली जाणार आहे. खते विक्रेत्यांची तपासणी सध्या प्राधान्याने केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com