कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची भरारी पथकांकडून तपासणी

कृषी विभागाची माहिती; पुणे जिल्ह्यात पंधरा भरारी पथके कार्यरत
कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची भरारी पथकांकडून तपासणी
Agriculture InputsAgrowon

पुणे ः शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत निविष्ठांचा पुरवठा (Input Supply) करण्यात येत आहे. चालू खरीप हंगामात (Current Kharif Season) शेतकऱ्यांना उच्चतम गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाच्या (Department Of Agriculture) कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत पुणे जिल्ह्यातील कृषी सेवा विक्री केंद्रांची (Krushi Seva Kendra) तपासणी वेगाने सुरू केली आहे. स्थापन केलेल्या पंधरा भरारी पथकांकडून ही तपासणी केली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यात बियाणांचे २४०६, खतांचे २४४३ व कीटकनाशकांचे २४२५ विक्रेते आहेत. या विक्रेत्यामार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात येते. या सर्व विक्रेत्यांकडील निविष्ठाची गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांद्वारे काढलेले नमुने घेऊन गुणवत्तेबाबत चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. त्यासाठी भरारी पथकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. कमी दर्जाच्या निविष्ठा आढळल्यास संबंधित विक्रेत्याचे परवाने निलंबित, रद्द करून त्याच्यावर कारवाई करण्यात येते.

गेल्यावर्षी कृषी निविष्ठांच्या नमुने तपासणीसाठी ३८ निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी बियाण्यांचे १०४८, खतांचे ६२३, तर कीटकनाशकांचे ४६० नमुन्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी बियाण्यांचे ९८६, खताचे ६१५, तर कीटकनाशकांचे ४५० नमुने घेऊन तपासणी केली होती. त्यापैकी बियाण्यांचे २१, खतांचे ७५, कीटकनाशकांचे १४ नमुने अप्रमाणित आढळून आले होते. तर खरीप, रब्बी हंगामात खतांचे १८९ बियाण्यांचे ५०, तर ९५ कीटकनाशक विक्रेत्याचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ५ बियाणे, २२ खतांचे, ११ कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कोर्ट केस दाखल करण्यात करण्यात आले. याशिवाय बियाणे विक्री करणारे १५, खते विक्री करणारे २१ आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्या ३१ विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

खरिपात कृषी सेवा केंद्र चालकांकडून अव्वाच्या सव्वा दराने निविष्ठाची विक्री होऊ नये आणि चांगल्या दर्जाच्या निविष्ठा मिळाव्यात यासाठी पंधरा भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे तपासणीचे काम वेगाने सुरू केले आहे. शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.
ज्ञानेश्वर बोठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com