River Conservation : वर्धा जिल्ह्यातील पाच नद्यांची जलतज्ज्ञांद्वारे पाहणी

नद्या स्वच्छ, प्रवाही आणि प्रदूषण व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
River Conservation
River ConservationAgrowon

Chala Januya Nadila Abjyan वर्धा: नद्या स्वच्छ, प्रवाही आणि प्रदूषण (River Pollution) व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ (River Conservation) हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत पुणे येथील जलतज्ज्ञांनी पाच गावांतील नद्यांची पाहणी करून उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, पुणे येथील सृष्टी पर्यावरण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली जोशी, पुणे येथील जलतज्ज्ञ व पाणी व्यवस्थापन अभ्यासक सतीश खाडे, अभियानाचे समन्वयक मुरलीधर बेलखोडे, सुनील राहाणे, भरत महोदय, राजू राठी, विजय आढाव, तर ऑनलाइन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते.

River Conservation
River Conservation : नदी संवाद यात्रेत लोकसहभाग गरजेचा

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामपंचायत काचनूर, मोरांगणा, खरांगणा, आंजी आणि महाकाळ या गावातील नदीचे वास्तव जाणून घेणे सोबतच गावातील वाहत जाणारे सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, सेप्टिक शौचालयातील नदीमध्ये जाणारे दूषित पाणी याची कारणे समजून घेणे व त्यावर दीर्घकालीन उपाय सूचविण्याकरिता जलतज्ज्ञ सायली जोशी व सतीश खाडे यांनी या गावांमधील नदींची पाहणी केली.

पाहणीवेळी अभियान समन्वयकांसह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ, उपअभियंता विलास काळबांडे उपस्थित होते.

River Conservation
River Conservation Summit : पुण्यात नदी संवर्धनावर दोनदिवसीय परिषद

गावातील सांडपाणी व घनकचऱ्यामुळे नद्या प्रदूषित होतात. त्यामुळे या पाच गावांतील नद्यांची पाहणी करून प्रदूषणाची स्थिती व त्यावरील उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पुणे येथील जलतज्ज्ञांनी काही उपाययोजना सुचविल्या त्यावर देखील यावेळी चर्चा झाली.

River Conservation
River Conservation : पंढरपुरातील चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता

गावातील नदीमध्ये वाहत जाणारे सांडपाणी पाणी विशिष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया करूनच नदीत सोडल्या जातील असे प्रयोग करणे आवश्यक आहे. पाच गावांमध्ये हा प्रयोग करण्याचे बैठकीत नियोजन करण्यात आले.

गावांना भेटीप्रसंगी आंजीचे सरपंच जगदीश संचारिया, महाकाळ सरपंच सूरज गोहो, खरांगणा सरपंच नीलिमा अक्कलवर, काचनूर उपसरपंच प्रशांत घंटेवर यांच्यासह गावांचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, समन्वयक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com