Smarudhhi Mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. त्यांनी नागपूर ते शिर्डी असा प्रवास करून महामार्गाची पाहणी केली.
Eknath Shinde Devendra Fadanvis
Eknath Shinde Devendra Fadanvis Agrowon

नागपूर : हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samrudhhi Mahamarg) पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नागपूर येथे आगमन झाले. त्यांनी नागपूर ते शिर्डी असा प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

Eknath Shinde Devendra Fadanvis
Agriculture OPEC : ‘ओपेक’ समजून घेण्यात शेतकऱ्यांचे हित

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.११) हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटर अंतराच्या महामार्गाच्या उद्‌घाटनासाठी येत आहेत.

Eknath Shinde Devendra Fadanvis
Agriculture Department : पणन संचालक रसाळ यांच्या नियुक्ती रद्दला स्थगिती

तत्पूर्वी या महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महामार्गाची पाहणी केली. या वेळी फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते.

त्यांच्या समवेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्हे २६ तालुके ३९२ गावांतून हा महामार्ग जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com