Lumpy Skin : केंद्रीय पथकाकडून सावडीत आजारग्रस्त जनावरांची पाहणी

जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र स्तरावरील तीन तज्ज्ञ पशुवैद्यकांचे पथक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र स्तरावरील तीन तज्ज्ञ पशुवैद्यकांचे पथक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या पथकाने सावडी (ता. करमाळा) येथील लम्पी स्कीनबाधित जनावरांची पाहणी केली. जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांसोबत या पथकाने चर्चा केली आहे. आता हे पथक नगर जिल्ह्यात
गेले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रतिबंधासाठी जनावरांची वाहतूक थांबवावी

नवी दिल्ली येथील केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. विजय कुमार, बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी इपिडेमिऑलॉजी अँड डिसीज इन्फॉर्मेटिक्‍सचे डॉ. मंजुनाथ रेड्डी, पुण्यातील एसीएच संस्थेचे डॉ. सुनील लहाने या तीन जणांच्या पथकाने ही पाहणी केली. तसेच काही सूचना केल्या. या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील सावडी (ता. करमाळा) येथे लम्पी स्कीनबाधित जनावरांची व परिसराची पाहणी केली. या वेळी पशुसंवर्धनचे सहायक आयुक्त डॉ. एन. ए. सोनवणे उपस्थित होते.

Lumpy Skin
Lumpy Skin : वासरातील ‘लम्पी स्कीन’चे नियंत्रण

जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील ८१३ गावांमध्ये लम्पी स्कीनचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत १६ हजार ६२१ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली होती. त्यापैकी सात हजार ६३८

जनावरे लम्पी स्कीनमुक्त झाली आहेत. एक हजार ५१ जनावरांचा आतापर्यंत या आजाराने मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ९३२ जनावरे लम्पी स्कीनबाधित आहेत. जिल्ह्यातील लम्पी स्कीन आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु तो अद्यापही आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर या पथकाची पाहणी महत्त्वाची मानली
जाते.

माळशिरस, करमाळ्याला सर्वाधिक झळ
लम्पी स्कीनमुळे जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, पंढरपूर आणि सांगोला भागांतील जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भागाला मोठी झळ बसली आहे. त्यामुळे या भागावरच आता पशुवैद्यकीय पथकाने लक्ष वेधले आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगोल्याच्या तहसीलदारांनी जनावरांसाठी स्वतंत्रपणे क्वरांटाइन सेंटरची मागणी करणारा प्रस्ताव पाठवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच हे सेंटर सुरू होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com