Water Resources : राज्यात पिण्याच्या पाण्याच्या तीन लाख स्रोतांची तपासणी

ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे राज्यात पिण्याच्या पाण्याची जलस्रोत तपासणी मोहीम सुरू केली आहे. पावसाळ्‍यानंतरच्या तपासणीनुसार राज्यात तीन लाख पाणी स्रोतांची तपासणी केली जाणार आहे.
Water Resources
Water ResourcesAgrowon

नगर : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी (Pure Drinking Water) मिळावे राज्यात पिण्याच्या पाण्याची जलस्रोत तपासणी (Water Resources Inspection) मोहीम सुरू केली आहे. पावसाळ्‍यानंतरच्या तपासणीनुसार राज्यात तीन लाख पाणी स्रोतांची तपासणी केली जाणार आहे. पाण्यातील एकूण चौदा घटक तपासले जातील. त्यानंतर पाणी शुद्धतेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहे. यंदा जलस्रोताच्या तपासणीसाठी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे.

Water Resources
Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार करावीत

राज्यात पिण्याच्या पाण्याचे तीन लाख तेरा हजार जलस्रोत आहेत. त्यात विहिरी, हातपंप व अन्य स्रोत आहेत. या स्रोतांतून जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला पाणी तपासणी केली जाते. शिवाय पाणी व स्वच्छता विभागाकडून दर सहा महिन्याला पावसाळ्याआधी व पावसाळ्यानंतर अशी दोन वेळा स्रोत तपासणी केली जाते. ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात पावसाळ्यानंतरची तपासणी मोहीम सुरू झाली आहे.

Water Resources
Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार करावीत

पाण्यातील एकूण चौदा घटकाची तपासणी केली जाणार असून, गावपातळीवर त्यासाठी जलसुरक्षकांसह ग्रामसेवक, महिलांची मदत घेतली जाणार आहे. पाण्याची तपासणी कशी करायची याबाबत गावपातळीवर सबंधितांना प्रशिक्षण दिले आहे. पाणीस्रोत तपासणीसाठी यंदा मोबाईल ॲप्लिकेशनची मदत घेतली जात आहे. नगर, गडचिरोली, गोंदिया, सातारा, चंद्रपूर, नांदेड, पालघर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत पाणीस्रोतांची संख्या अधिक आहे.

स्रोत तपासणीनंतर पाण्यात कोणता घटक अधिक आहे. ते पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, वाढलेल्या घटकावर काय उपाययोजना करायच्या हे कळणार आहे. आरोग्यास हानिकारक घटक पाण्यात अधिक प्रमाणात आढळल्यास ते पाणी पिण्यात अयोग्य असल्याचे सांगितले जाते.

या घटकाची होते तपासणी

अमोनिया, अर्सिनिक, नायट्रेट, फ्लोराईड, आयर्न, अल्कानिटी, हार्डनेस, क्लोराइड, टरर्बिटिंग, डिझॉल्ट सॉलिडेस, पीएच,

जिल्हानिहाय तपासले

जाणारे पाणीस्रोत

नगर : ९३५४, अकोला : ४०९७, अमरावती : ८६६८, औरंगाबाद : ६७७५, बीड : १२५१९, भंडारा : ९४२३, बुलडाणा : ८४००, चंद्रपूर : १५२३६, धुळे : ४१९८, गडचिरोली : १४८७९, गोंदिया : १४४८३, हिंगोली : २८३४, जळगाव : ३४००, जालना : ६४७४, कोल्हापुर : ६०८२, लातुर : ९५०१, नागपूर : १०१९५, नांदेड : १३०५६, नंदुरबार : ८६५९, नाशिक : ९३८४, उस्मानाबाद : ६४०१, पालघर : ११५५६, परभणी : ८१४०,पुणे : १२११६, रायगड : ७७३३, रत्नागिरी : ८०२१, सांगली : ७२५७, सातारा : १०४९६, सिंधुदुर्ग : ७५३३, सोलापूर : १३४९९, ठाणे : ३५८४, वर्धा : ७२१६, वाशीम : ७३९६, यवतमाळ : १११९६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com