Fake Pesticide : बनावट कीटकनाशकांच्या विक्रीसह गुणवत्तेचा गंभीर मुद्दा तपासणीतून उघड

कीडनाशके तयार करताना तांत्रिक निकषांनुसार त्यातील घटकांचा दर्जा व प्रमाण निश्चित करण्यात आलेले असते. मात्र हैदराबाद येथील एका उत्पादनात अशी गुणवत्ता नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे.
Fake Pesticide
Fake PesticideAgrowon

नाशिक : जिल्ह्यात बनावट कीटकनाशके (Fake Pesticide) व बुरशीनाशकांची (Fake Fungicide) विक्री अनधिकृत विक्रेत्यांकडून होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कृषी विभागाच्या (Department Of Agriculture) जिल्हा भरारी पथकाने छापा टाकत कीडनाशके जप्त केली होती. त्यानंतर नमुने कृषी विभागाच्या कीटकनाशक विश्लेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर ते अप्रमाणित असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार आवश्यक प्रमाण नसून ते शून्य ते ०.६५ टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे बनावट कीडनाशकांच्या विक्रीसह गुणवत्तेचा गंभीर मुद्दा तपासणीतून उघड झाले आहे.

Fake Pesticide
Fake Pesticides : दिंडोरीत ६ लाखांची बनावट कीटकनाशके जप्त

कीडनाशके तयार करताना तांत्रिक निकषांनुसार त्यातील घटकांचा दर्जा व प्रमाण निश्चित करण्यात आलेले असते. मात्र हैदराबाद येथील एका उत्पादनात अशी गुणवत्ता नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. मागील महिन्यात कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अभिजित घुमरे व मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी छापा टाकत साठा जप्त केला. त्यांनतर ओझर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता.

निकृष्ट दर्जाच्या व बनावट कीडनाशकांचा वापर केल्यास द्राक्ष, डाळिंब किंवा अन्य पिकांवरील किडी व रोगांचे नियंत्रण होत नाही. परिणामी पीक संरक्षण खर्च वाया जातो.त्यामुळे शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी विनापरवाना विक्री करणाऱ्या व्यक्तींकडून कीटनाशकांची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

Fake Pesticide
Glyphosate Pesticide : शेतकऱ्यांना ग्लायफोसेट फवारता येणार नाही

तपासणीत आढळून आलेले प्रमाण

कीटकनाशकाचे/बुरशीनाशकाचे नाव...नियमानुसार

आवश्यक प्रमाण...तपासणीत आढळलेले प्रमाण(प्रमाण टक्के)

इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के डब्लू जी... ५...०.६५

थायामेथोक्झाम २५ टक्के डब्लू पी...२५...०.१०

फोसेलल ८० टक्के डब्लूपी...८०...०.२५

डायमेथोमॉर्फ ५० टक्के डब्लूपी...५०...०

डायफेनोकोनॅझोल २५ टक्के इसी...२५...०

मेटॅलाक्झिल ३५ टक्के डब्लूपी...३५...०

कासुगामायसीन अधिक कॉपर ऑक्झीक्लोराईड ४५ डब्लूपी...४५...०

सायमोक्झॅनील अधिक मॅंन्कोझेब डब्लूपी...६४...०

कीडनाशके खरेदी करताना ही घ्यावी काळजी

- विनापरवाना, बेकायदेशीर विक्री करणाऱ्या व्यक्तींकडून खरेदी करू नये.

- कीटकनाशकांच्या बाटलीवर कीटकनाशकाचे तांत्रिक नाव, सीआयबीआरसी नोंदणी क्रमांक(CIR No), कीडनाशक उत्पादन परवाना क्रमांक छापला असल्याची खात्री करूनच खरेदी करावी.

- बाटलीवर उत्पादकाचे नाव व पत्ता, बॅच क्र, उत्पादन व वापराची अंतिम तारीख मुदत पाहावी.

- गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी करावी.

- विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी.

- खरेदी केलेल्या कीडनाशकाचे वेष्टण जपून ठेवावे.

द्राक्ष बागायतदार संघाच्या चर्चासत्रात मुद्दा चर्चेत

जिल्ह्यात छापा टाकल्यानंतर ज्यावेळी कारवाई होते. त्यावेळी अनेकदा विक्रेते व कंपन्यांचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळे कोणत्या कंपन्या व विक्रेते अशा पद्धतीने चुकीचे काम करतात ती माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही ,त्यामुळे अशा विक्रेते व कंपन्यांची नावे जाहीर करावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.

परवानाधारक नोंदणीकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावी. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहावे. कुणी अनधिकृत विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी कळवावे.त्यावर कारवाई करण्यात येईल.
मोहन वाघ, कृषी सहसंचालक, नाशिक विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com