Fertilizer : कंपन्यांना लिंकिंगचे साहित्य परत घेण्याचे निर्देश द्या

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर बैठक घ्यावी, अशी मागणी ‘माफदा’ने केली होती.
Fertilizer
FertilizerAgrowon

नागपूर : रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी (Chemical Fertilizer Production Company's) लिंकिंगचे साहित्याचा (Linking Material) जबरदस्तीने पुरवठा केला होता. ते परत घेण्यासंदर्भात कंपन्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स व सीड्स डीलर्स असोसिएशन’ने (माफदा) केली आहे.

Fertilizer
तर लिंकिंग हितकारक

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर बैठक घ्यावी, अशी मागणी ‘माफदा’ने केली होती. त्यानुसार गुण नियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयुक्तालयात बैठक झाली. त्यात कंपन्यांकडून होणाऱ्या अडवणुकी संदर्भात विविध मुद्दे ‘माफदा’च्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. ‘माफदा’चे महासचिव विपिन कासलीवाला, अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांच्यासह पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Fertilizer
अकोल्यातही विक्रेत्यांची डीएपीसोबत लिंकिंग

काही कंपन्या खताचा पुरवठा करताना संबंधित डीलर्सकडून वाहतूक व हमाली खर्च वसूल करतात. याची वसुली विक्रेत्यांकडून एमआरपीपेक्षा जादा दर आकारून केली जाते. परंतु किरकोळ विक्री मूल्यापेक्षा जादा दराने करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यभरात खत विक्रेत्यांविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्यावरून अनेक ठिकाणी कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली. या प्रकरणात खत विक्रेत्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना मात्र कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाने पुढाकार घेत वाहतूक व हमाली खर्च कंपन्यांनी करावा, असे निर्देश द्यावेत अशी या वेळी करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषी निविष्ठा विक्रेते व कृषी अधिकारी यांच्या विरोधात फटके मारण्याची भाषा वापरली होती. राज्यभरातील ५० हजार विक्रेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाईसाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी ‘माफदा’ने केली.

‘माफदा’च्या मागण्या

- मार्जिनमध्ये कंपन्यांनी वाढ करावी

- मुदतबाह्य कीटकनाशक साठा नष्ट करणारी कोणतीच यंत्रणा कृषी विक्रेत्यांकडे नाही. असा साठा दुकानात आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे शिल्लक साठा कंपन्यांनी परत न्यावा.

- कंपनीकडून सीलबंद साहित्याचा पुरवठा केला जातो. तरीही ते साहित्य नापास झाल्यास संबंधित विक्रेत्याला देखील दोषी ठरविले जाते. केवळ कंपन्यांनाच दोषी ठरवा.

सॅम्पलची थकीत रक्कम द्या

गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी राज्यभरातील विक्रेत्यांकडून हंगामात विविध सॅम्पल गोळा करतात. मात्र त्यापोटीची रक्कम गेल्या पंधरा वर्षांपासून थकीत आहे. ती पाच कोटीच्या घरात पोहोचली आहे. ही रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणीही ‘माफदा’ने केली.

इफ्को, कोरोमंडल, आरसीएफ, झुआरी, नर्मदा बायोकेम, आयपीएल, कृपको, चंबळ फर्टिलायझर्स, सरदार, स्पीक, स्मार्टस्केल या कंपन्यांकडून लिंकिंग होत असल्याचे ‘माफदा’ने लेखी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com