विदर्भात उन्हाचा चटका असह्य

पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाची ताप पुन्हा वाढू लागली आहे. उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः भाजून निघाल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे.
विदर्भात उन्हाचा चटका असह्य
Heat WaveAgrowon

पुणे : पूर्वमोसमी पावसाने (Pre-season Rain) उघडीप दिल्याने राज्यात उन्हाची ताप (Heat) पुन्हा वाढू लागली आहे. उष्ण लाटेने (Heat Wave) विदर्भ अक्षरशः भाजून निघाल्याने उन्हाचा चटका (Tempreture) असह्य होत आहे. शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही उष्ण लाट होती. आज (ता.५) विदर्भात उष्ण लाटेचा (Vidarbh Heat Wave) इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान ४६ अंशांपार तर गोंदिया, वर्धा येथे तापमानाचा पारा ४५ अंशांच्या वर होता. नगर येथे पारा ४१ अंशांपार असून, कमाल तापमानात ५ अंशांपेक्षा वाढ झाल्याने उष्ण लाट होती. विदर्भात कमाल तापमान ३९ ते ४७ अंश, मराठवाड्यात ४१ ते ४२ अंश, मध्य महाराष्ट्रात २९ ते ४२ अंश तर कोकणात ३२ ते ३४ अंशांच्या आसपास होते.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून नागालॅण्ड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम सक्रिय आहे. पश्चिम बंगालपासून आंध्रप्रदेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बिहार ते आंध्र प्रदेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अग्नेय बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

आज (ता. ५) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३६.९, नगर ४१.४, धुळे ४१.२, जळगाव ४१.७, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्वर २९.४, मालेगाव ४२.२, नाशिक ३६.१, निफाड ३७.२, सांगली ३३.९, सातारा ३७.५, सोलापूर ३८.३, सांताक्रूझ ३४.१, डहाणू ३४.२, रत्नागिरी ३३.७, औरंगाबाद ४१.०, नांदेड ४१.०, अकोला ४३.६, अमरावती ४४.४, बुलडाणा ३९.२, ब्रह्मपुरी ४६.१, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४५.४, नागपूर ४६.२, वाशीम ४१.५, वर्धा ४५.२, यवतमाळ ४३.२.

मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गोव्याच्या उंबरठ्यावर पोचले आहेत. मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची प्रगती थांबली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमनही लांबले आहे. बंगालच्या उपसागरावरील शाखेने संपूर्ण ईशान्य भारत व्यापला आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. शनिवारी (ता.४) मॉन्सूनची वाटचाल कायम होती.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com