Cotton Bollworm
Cotton BollwormAgrowon

Cotton Bollworm : बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा

वातावरणातील बदलाचा परिणाम होत चालू हंगामातील कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

चंद्रपूर ः केंद्रीय कापूस संशोधन संस्थेअंतर्गत (Cotton Research Center) वरोरा येथे गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Management OF Pink Bollworm) याविषयी प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), तसेच जिल्हा प्रकल्प समन्वयक डॉ. चिन्ना बाबू नाईक यांनी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना बोंड अळी नियंत्रण विषयक तंत्रशुद्ध माहिती दिली.

Cotton Bollworm
Cotton Boll Worm : तेलंगणामुळे बोंड अळीची भीती

वातावरणातील बदलाचा परिणाम होत चालू हंगामातील कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही भागात बोंडसडच्या समस्येलाही शेतकरी सामोरे जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सीआयसीआर’ने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. चिन्ना बाबू नाईक म्हणाले, की या किडीचे वेळीच नियंत्रण शक्‍य व्हावे याकरिता शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्यांचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला पाहिजे.

Cotton Bollworm
Cotton Bollworm : खानदेशात कपाशीचे मोठे क्षेत्र रिकामे

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची कारणे जाणून घेत त्याचे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीनुसार नियंत्रण करावे. एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीविषयी त्यांनी या वेळी उपस्थितांना माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या समस्यांचे देखील निरसन त्यांच्याव्दारे करण्यात आले. जिल्हा प्रकल्प सहसमन्वयक डॉ. टी. प्रभुलिंगा यांनी प्रकल्पाचे स्वरूप, रसशोषक किडींमुळे होणारे नुकसान आणि त्याचे व्यवस्थापन याविषयी मर्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रशिक्षण समन्वयक सुभाष बोबडे, क्षेत्र अधिकारी मंगेश ठोंबरे, पराग सहारे, आकाश दुर्शेट्टीवार, प्रकाश लोखंडे, प्रदीप पोटे, विठ्ठल निब्रड, लक्ष्मी माथनकर, भावना रोहनकार यांची उपस्थिती होती. बोर्डा, जामगाव, साखरा, तळेगाव आण सागरा या गावांतील शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com