Rain : धरणक्षेत्रात पावसाचा कमीअधिक जोर

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र धरणक्षेत्रात पावसाचा कमीअधिक जोर आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
Pune Rain Update
Pune Rain Update Agrowon

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर (Rain Intensity In Pune District) कमी झाला आहे. मात्र धरणक्षेत्रात पावसाचा कमीअधिक जोर आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Pune Rain Update
Nagpur Rain News: पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम

जिल्ह्यात दहा ते पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यामुळे पावसाच्या चांगल्याच सरी बरसत आहेत. मात्र धरणक्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली असली तरी अधूनमधून पाऊस बरसत आहे. धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नव्याने १०.०८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच धरणे भरत आली आहे. काही धरणे शंभर टक्के झाली असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

वडीवळे धरणापाठोपाठ टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही ५५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४ मिलिमीटर, पानशेत ३३, गुंजवणी ३१, नीरा देवघर २८, पवना २६, कासारसाई २७, कळमोडी २५, चासकमान २३, आंध्रा २२, डिंभे १८ मिलिमीटर पाऊस पडला. तर भाटघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. याशिवाय शेटफळ, नाझरे, वीर, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याने हलक्या जमिनीतील पिके वाफसा स्थितीत येत आहेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे व भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याचेही स्थिती आहे.

...या धरणांतून विसर्ग सुरू आहे

वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com