Rain Update : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

गेल्या आठवड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : गेल्या आठवड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा ओसरला आहे. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather Pune) असून, धरणक्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे पाण्याची आवक (Water Inflow To Dam) सुरू असल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

चालू वर्षी पुणे जिल्ह्यात उशिराने जोरदार पाऊस झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने चांगलाच मुसळधार पाऊस कोसळल्याने धरणांतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. त्यातच नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस बरसला. यंदा एक जूनपासून ते २० सप्टेंबर या कालावधीत मुळशी धरणांच्या घाटमाथ्यावर चालू वर्षी सर्वाधिक ७,३६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. गेल्या वर्षी याच काळात घाटमाथ्यावर ६,१८७ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा लोणावळ्यात ४,५७४, वळवण ३,८८२, ठोकरवाडी येथे २,९३४, शिरोटा २,२७८ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update
Heavy Rain : जिल्ह्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीचा कहर

यंदा टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ३,४०७ मिलिमीटर पाऊस पडला. तर गेल्या वर्षी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २,९३० मिलिमीटर पाऊस पडला होता. याशिवाय वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २,७५९ मिलिमीटर, पवना धरणात २,६२७ मिलिमीटर, पानशेत २,५०४ मिलिमीटर, वरसगाव २,४९९, गुंजवणी धरणात २,४५९, नीरा देवघर येथे २,२६२, कासारसाई १,१५६, कळमोडी १,७२८, भामा आसखेड १,१५१, आंध्रा धरणात १,५०३, पिंपळगाव जोगे १,२०६, माणिकडोह १,४०९, येडगाव १,१८८, डिंभे १,३६१ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update
Rain Update : औरंगाबाद जिल्ह्यात आठ मंडळात अतिवृष्टी

तर खडकवासला, चासकमान, शेटफळ, नाझरे, भाटघर, वीर, वडज, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला. विसापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वात कमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

तुरळक सरी बरसल्या

दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप घेतली आहे. तरी पवना, कळमोडी, आंध्रा, वडिवळे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी, मुळशी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. तर, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com