Nashik Rain : पावसाचा जोर कमी; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच
Rain Update
Rain Update Agrowon

नाशिक : जिल्ह्यात गेल्या सप्ताहापासून सुरू असलेल्या धोधो पावसाने (Heavy Rain In Nashik) पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्र्वर व कळवण तालुक्यांत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाल्याने शेतीपिकांसह (Crop Damage Due To Heavy Rain) घरांची पडझड, जनावरे मृत होण्यासह मोठे नुकसान झाले होते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले आहे.

Rain Update
नाशिक जिल्ह्यात पेरणी ४८ टक्क्यांवर

रविवारी (ता. १७) नाशिक शहरासह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाल्याने सततच्या पावसापासून शेतकऱ्यांना काहीशी सुटका मिळाली होती; मात्र सोमवारी (ता. १८) सकाळपासून संततधार पावसाने नाशिक शहरासह पश्चिम भागात हजेरी लावली; मात्र गेल्या सप्ताहानंतर पाऊस कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग सुरू आहे; मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर विसर्ग घटविण्यात आला आहे. गंगापूर धरण समूहातील प्रमुख गंगापूर धरणातून विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेला पंचवटी परिसरात पाणी कमी झाले आहे.

Rain Update
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या २४ धरण प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणांमध्ये ५२,५४५ दलघफू पाणीसाठा झाला असून ही टक्केवारी ८० टक्के आहे. मागील वर्षी हाच साठा १८,५८० दलघफू इतका होता तर टक्केवारी अवघी २८ टक्के होती. त्यामुळे ५२ टक्क्यांनी तो वाढला आहे. सध्या ८ धरणे तुडुंब भरली आहेत. सोमवारी(ता. १८) गंगापूर, आळंदी, पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, गिरणा या १७ धरणांमधून विसर्ग सुरू आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आला आहे.

प्रामुख्याने गंगापूर, दारणा व गिरणा धरण समूहाच्या पाणलोट समूहातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम-उत्तर भागातील अनेक नद्यांना पूर आल्याने काठच्या शिवाराची दाणादाण उडाली आहे. गेल्या सप्ताहापासून त्रंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा तालुक्यातील भात, नागली, वरई लागवडी तर कळवण, सटाणा व देवळा या तालुक्यातील शिल्लक राहिलेल्या पेरणीही वापसा नसल्याने खोळंबल्या आहेत. सुरगाणा तालुक्यात पाऊस कमी झाला आहे. इगतपुरी, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पाऊस सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com