Rain Update : पावसाचा जोर कमीच राहणार

राज्याच्या काही भागांत बुधवारी पावसाच्या जोरदार सरी झाल्या. कोकणात अनेक मंडळांत मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon

पुणेः राज्यात पावासाचा जोर (Rain Intensity) कमी झालाय. मात्र काही मंडळांमध्ये जोरदार सरी बरसल्या. मराठवडा आणि विदर्भात पावासाचा जोर (Rainfall) अधिक होता. हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत मराठवडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केलाय.

राज्याच्या काही भागांत बुधवारी पावसाच्या जोरदार सरी झाल्या. कोकणात अनेक मंडळांत मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. वाऱ्याचा वेगदेखील वाढला. बुधवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला होता. तर रत्नागिरी जिल्ह्यातही ठिकाठकाणी पावसाने हजेरी लावली. रायगड आणि पालघर जिल्ह्यताही बऱ्याच भागांत पाऊस झाला.

Rain Updates
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

पुणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. काही ठिकाणी कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडतोय. बुधवारी राजूरमध्ये २० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्ह्यात बहुतांशी भागांत हलका पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही ठिकाठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता. काही भागांत जोरदार सरी बरसल्या. सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पावसाच्या सरी होत आहेत.

Rain Updates
काय तो पाऊस, काय ते बेड, काय ती पिकं, सगळं ओकेमधे...

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार सरी झाल्या. तर इतर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला.

विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर वाढला होता. अमरावतीतही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या. मात्र जोरदार पावसाची नोंद झाली नाही.

खानदेशात पावसाची रिमझीम सुरुच आहे. एक दोन दिवसांची उसंत घेऊन पाऊस पुन्हा हजेरी लावत लावतोय. नंदुरबार जिल्ह्यातील शिवण मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळं शिवण नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

हवामान विभागानं राज्यातील काही भागांत आज जोरदार पावसाचा इशारा दिलाय. तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असा अंदाज व्यक्त केलाय. उद्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील वाशीम, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com